सातबारा Watch

← साकुर

Ferfar #4217 · साकुर

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
765
Talathi
संतोष शिवाजी फोकने
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 खरेदी लिहुन देणार :- 1. कौसल्याबाई गोपाळ आवारी, 2. मनिषा गोपाळ आवारी, 3. मिराबाई गोपाळ आवारी, 4. रुपाली गोपाळ आवारी (खाता क्रमांक :- 352) यांचे गट क्रमांक 765 लागवडीयोग्य क्षेत्र 2.7910 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. हे त्यांनी खरेदी लिहुन घेणार :- 1. नवीन सुभाष खेताडे (खाता क्रमांक :- 3839) यांना दुय्यम निबंध‍क इगतपुरी यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3750 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 16,86,560.00 घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहून देणार व घेणार आदिवासी शेतकरी असून लिहून घेणार यांनी मौजे बोदर्डे ता. पारोळा जि. जळगाव येथील गट नंबर 35/2 चा 7/12 उतारा शेतकरी पुरावा म्हणून जोडला आहे. लिहून देणार व लिहून घेणार हे आदिवासी समाजाचे असल्याने जमीन खरेदी कामी मा. अपर जिल्हाधिकारी नाशिक यांची परवानगी घेतली आहे. मा. अपर जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक कक्ष-4/ कु.का.-2/ एस.आर. /401/2026 नाशिक दिनांक 17/09/2026 रोजीचे आदेशानुसार परवानगी घेतली असुन आदेशातील अटी व शर्तीला अधीन राहुन परवानगी दिली आहे. अटी व शर्ती खालील प्रमाणे :- 1. श्रीमती. कौसल्याबाई गोपाळ आवारी, श्रीमती मिराबाई गोपाळ आवारी, कु.रुपाली गोपाळ आवारी व कु. मनिषा गोपाळ आवारी यांची वरील शेतजमीन श्री. नवीन सुभाष खेताडे यांनाच विक्री करता येईल. 2. श्री. नवीन सुभाष खेताडे यांनी सदरची मिळकत महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अ ला अधिन राहुन फक्त शेती प्रयोजनासाठी धारण करावी. 3. जमिन खरेदी घेणार यांनी आदीवासी असल्याचे प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र दिल्यावरून ही परवानगी देण्यात येत आहे. जातीचे प्रमाणपत्र हे अवैध ठरल्यास किंवा खोडी माहीती दिल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र अनुःजमातींना जमिनी प्रत्यार्पित करणे अधिनियम, 1974 प्रमाणे कार्यवाहीस पात्र राहील. 4. खरंदीखतावर मुळ जमीन मालक यांची स्वाक्षरी घेण्यात यावी. 5. जमिनीचा विक्री व्यवहार या आदेशाच्या दिनांकापासून पंधरा दिवसानंतर व तीन महिन्यांच्या आत नोंदणीकृत करण्यात यावा. अन्यथा दिलेली परवानगी आपोआप व्यपगत होईल. 6. प्रस्तुत जमिनीबाबत अर्जदार व खरेदीदार यांनी सदर प्रकरणामध्ये सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्यामध्ये काही त्रुटी आढळुन आल्यास वा खोटी माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास वा फौजदारी कार्यवाहीस पात्र राहील. 7. अर्ज मिळकतीचे सक्षम प्राधिकारी यांचे पूर्व परवानगी शिवाय तुकडे पाडता येणार नाही. 8. सदर गटात भूसंपादन झाले असल्यास भूसंपादित क्षेत्र संबंधित यंत्रणेस देणे जमीन घेणार यांचेवर बंधनकारक राहील. 9. सदर जमीन विक्री केल्यानंतर जमीन मालक भुमिहिन होत असल्यास भविष्यात शासनाकडे उदरनिर्वाहासाठी जमीन मागणी करता येणार नाही. 10. अर्ज मिळकतीच्या मालकी हक्काबाबत कोणत्याही महसूली अथवा दिवाणी न्यायालयात वाद प्रलंबित असल्यास, सदर प्रलंबित न्यायालयीन प्रकरणात संबंधित न्यायालयाकडुन पारीत होणारे आदेश अर्ज मिळकतीचे हस्तांतरण व मालकी हक्कावर बंधनकारक राहील. 11. सदर जमीनीचे साठेखताची रक्कम ही रू.10,00,000/- एवढी असून मुल्यांकनाची रक्कम रु.16,86,560/- एवढी आहे. मुल्यांकनाची रक्कम साठेखतातील रक्कमेपेक्षा अधिक असल्याने मुल्यांकनाची रक्कम ही जमीनीची किंमत ठरविणेत येत आहे. जमीन मालक यांचे नांवे रक्कम रु.16,86,560/- (अक्षरी रक्कम- सोळा लाख शहाऐंशी हजार पाचशे साठ रुपये मात्र) ही राष्ट्रीयकृत बँकेत धनादेशाद्वारे जमा करावी व बँकेचे खात्यात रक्कम जमा झालेबाबतचे प्रमाणपत्र खरेदीखतामध्ये समाविष्ट करावे. त्या शिवाय दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणीकृत करु नये. 12. प्रस्तुत मिळकती संबंधित भुधारकाचे एकूण क्षेत्र व लागु असलेला स्लॅब विचारात घेवुन निश्चित केलेले संपादन पात्र क्षेत्र संपादनावेळी शासनास देण्याची जबाबदारी भुधारकाची आहे. सदर जबाबदारी हस्तांतरणानंतर नविन भुधारकाची राहील. त्यामुळे हस्तांतरण झालेनंतरही जरी संबंधित नविन भुधाकराचे एकुण क्षेत्र लागु असलेल्या स्लॅब पेक्षा कमी असले तरी संपादन पात्र क्षेत्र संपादना वेळी शासनास देण्याची जबाबदारी संबंधित नविन भूधारकाची राहील. या स्वरुपाचे हमी खरेदीखतात नमुद करण्याची जबाबदारी भूधारकाची राहील. 13. तहसीलदार इगतपुरी / ग्राम महसूल अधिकारी साकुर यांनी आदिवासीला यापुर्वी अदा केलेली रक्कम खातेदाराच्या नांवे राष्ट्रीयकृत बँकेत त्यांचे समक्ष खाते उघडुन धनादेशाव्दारे रक्कम अदा झाल्याची खात्री करावी. त्या शिवाय अधिकार अभिलेखात खरेदी विक्री व्यवहाराची फेरफार नोंद पारीत करु नये. 14. प्रस्तावित व्यवहारात खालील कायद्याचे निर्बंध लागु राहतील. अ) महाराष्ट्र शेतजमिन (ज.धा.क.म.) - 1961 ब) महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेत जमिन - 1948 क) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता कुळवहिवाट विधी (सुधारणा) अधिनियम-1974 (1974/35) ड) महाराष्ट्र अनुसुचित जमातींना जमिनी प्रत्याप्रित करणे अधिनियम -1974 (1975/14) इ) सदरची परवानगी फक्त याच कायद्यांतर्गत देण्यात आली आहे. या संबंधात नागरी जमिन (कमाल मर्यादा विनियमन) अधिनियम 1976, महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना कायदा 1966, महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम-1966 किंवा अन्य कोणत्याही कायद्यानुसार वा नियमानुसार परवानगी घेणे जर आवश्यक असेल तर तशी परवानगी घेणे अर्जदार यांचे वर बंधनकारक राहील. नोंद सूची क्रमांक 2, खरेदी खताची नक्कल दुय्यम निबंध‍क इगतपुरी यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3750 दिनांक 13/10/2026 व मा. अपर जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक कक्ष-4/ कु.का.-2/ एस.आर. /401/2026 नाशिक दिनांक 17/09/2026 यावरून केली असे.