सातबारा Watch

← धामणगांव

Ferfar #3402 · धामणगांव

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
772, 774
Talathi
वर्षा विलास देशमुख
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- एकनाथ किसन तिटकारे रा. धामणगांव(खाता क्रमांक1845) यांचे गट/सर्व्हे क्रमांक772, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी एकनाथ किसन तिटकारे रा. धामणगांव(खाता क्रमांक1845) गट/सर्व्हे क्रमांक774, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6570 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5970 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : दामिनी नंदु तातळे , (खाता क्रमांक :-1939)गट/सर्व्हे क्रमांक 772 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी दामिनी नंदु तातळे , (खाता क्रमांक :-1939)गट/सर्व्हे क्रमांक 774 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5970 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक इगतपुरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3861 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5144716 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच मा.जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक कक्ष -4/कुका -2 .आर .313/2026 नाशिक दिनांक -05/10/2026 अन्वये खालील अटी व शर्ती यांना अधीन राहुन अटी व शर्ती 1. श्री. एकनाथ किसन तिटकारे, रा.धामणगाव , ता. इगतपुरी, जि. नाशिक यांची जमीन श्रीम.दामिनी नंदु तातळे रा.सम्राटसिंफनी,नागरे नगर ,पाथर्डी फाटा ,ता.,जि.नाशिक यांनाच विक्री करता येईल. 2. श्रीम.दामिनी नंदु तातळे रा.सम्राटसिंफनी,नागरे नगर ,पाथर्डी फाटा ,ता.,जि.नाशिक यांनी सदरची मिळकत महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अ ला अधिन राहून फक्त शेती प्रयोजनासाठी धारण करावी. 3. जमीन खरेदी घेणार यांनी आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र दिल्यावरुन ही परवानगी देण्यात येत आहे. जातीचे प्रमाणपत्र हे अवैध ठरल्यास किंवा खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र अनु.जमातींना जमिनी प्रत्यार्पित करणे अधिनियम, 1974 प्रमाणे कार्यवाहीस पात्र राहील. 4. खरेदीखतावर मूळ जमीन मालक यांची स्वाक्षरी घेण्यात यावी. 5. सदर जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार आदेशाचे दिनांकापासुन पंधरा दिवसांनंतर व तीन महिन्याच्या आत पर्यंत नोंदणीकृत करण्यात यावा. अन्यथा दिलेली परवानगी आपोआप व्यपगत होईल. 6. प्रस्तुत जमिनीबाबत अर्जदार व खरेदीदार यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्यामध्ये काही त्रुटी आढळुन आल्यास वा खोटी माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास वा फौजदारी कारवाईस पात्र राहील. 7. अर्ज मिळकतीचे सक्षम प्राधिकारी यांचे पुर्व परवानगी शिवाय तुकडे पाडता येणार नाही. 8. सदर गटात भूसंपादन झाले असल्यास सदर क्षेत्र यंत्रणेस देणे बंधनकारक राहील. 9.सदर जमीन विक्री केल्यानंतर जमीन मालक भूमिहीन होत असल्यास भविष्यात शासनाकडे उदरनिर्वाहासाठी जमीन मागणी करता येणार नाही. 10.मे.दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर इगतपुरी यांचे न्यायालयातील स्पे.मु.नं.193/2023 मध्ये होणारे न्यायनिर्णय खरेदी देणार व खरेदी घेणार यांचेवर बंधनकारक राहतील. 11.अर्ज मिळकतीच्या मालकी हक्काबाबत कोणत्याही महसुली अथवा दिवाणी न्यायालयात वाद प्रलंबीत असल्यास,सदर प्रलंबीत न्यायालयीन प्रकरणात संबंधित न्यायालयाकडून पारित होणारे आदेश अर्ज मिळकतिचे हस्तांतरण व मालकी हक्कावर बंधनकारक राहील. 12.सदर जमीनीचे साठेखताची रक्कम ही रू. 40,00,000/- ही व्यवहाराची रक्कम असून मुल्यांकनाची रक्कम रु.51,44,716/- एवढी आहे. मुल्यांकनाची रक्कम साठेखतातील रक्कमेपेक्षा अधिक असल्याने मुल्यांकनाची रक्कम ही जमीनीची किंमत ठरविणेत येत आहे. जमीन मालक यांचे नांवे रक्कम रु.51,44,716/- (एक्कावन लाख चौरेचाळीस हजार सातशे सोळा रुपये मात्र) ही राष्ट्रीयकृत बँकेत जमा करावी व याबाबतचे बँकेचे खात्यात रक्कार जमा झालेबाबतचे प्रमाणपत्र खरेदीखतामध्ये समाविष्ट करावे त्याशिवाय दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणीकृतं करु नये. 13 . प्रस्तुत मिळकती संबंधित भुधारकाचे एकूण क्षेत्र व लागु असलेला स्लॅब विचारात घेवुन निश्चित केलेले संपादन पात्र क्षेत्र संपादनावेळी शासनास देण्याची जबाबदारी भुधारकाची आहे. सदर जबाबदारी हस्तांतरणानंतर नविन भुधारकाची राहील. त्यामुळे हस्तांतरण झालेनंतरही जरी संबंधित नविन भुधाकराचे एकुण क्षेत्र लागु असलेल्या स्लॅब पेक्षा कमी असले तरी संपादन पात्र क्षेत्र संपादना वेळी शासनास देण्याची जबाबदारी संबंधित नविन भूधारकाची राहील. या स्वरुपाचे हमी खरेदीखतात नमुद करण्याची जबाबदारी भूधारकाची राहील. 14 . तहसिलदार इगतपुरी / ग्राम महसूल अधिकारी धामणगाव यांनी आदिवासी खातेदारास यापूर्वी अदा केलेली रक्कम खातेदाराच्या नांवे राष्ट्रीयकृत बँकेत त्यांचे समक्ष खाते उघडुन धनादेशाद्वारे रक्कम अदा झाल्याची खात्री करावी. त्याशिवाय अधिकार अभिलेखात खरेदी विक्री व्यवहाराची नोंद करू नये. 15 . प्रस्तावित व्यवहारात खालील कायदयाचे निर्बंध लागु राहतील. अ) महाराष्ट्र शेतजमीन (ज.धा.क.म) -1961 ब) महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम-1948 क) महाराष्ट्र धारण जमीनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, 1947 ड) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता कुळवहिवाट विधी (सुधारणा) अधिनियम-1974 (1974/35) ई) सदरची परवानगी फक्त याच कायदयातंर्गत देण्यात आली आहे. या संबधीत नागरी जमिन (कमाल) मर्यादा विनियमन) अधिनियम-1966 किंवा अन्य कोणत्याही कायदयानुसार व नियमानुसार परवानगी घेणे जर आवश्यक असेल तर तशी परवानगी घेणे अर्जदार यांचे वर बंधनकारक राहील, वरीलपैकी कोणत्याही अटी अगर शर्तीचा भंग झाल्यास व चौकशी अंती निष्पन झाल्यास सदरची परवानगी रद्द होणेस व शास्तीस पात्र राहील. देणार घेणार दोघेही शेतकरी असुन घेणार यांनी शेतकरी पुरावा मौजे बेलगाव तऱ्हाळे ,ता.इगतपुरी, जि. नाशिक येथील गट नं.84 चा 7/12 उतारा जोडला असे.नोंद अर्ज ,सुची क्र.2 व खरेदी खताचे नक्कल वरोन केली असे.