सातबारा Watch

← दोडी बु

Ferfar #11444 · दोडी बु

सिन्नर, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
272
Talathi
किशोर अशोक दाते
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 नोदीचा प्रकार:- खरेदी सह दु.नि. सिन्नर 2 यांचे खरेदी दस्‍त क्र 4110 दिनांक 14/10/2026 तसेच जिल्हाधिकारी कायांलय, नाशिक यांचा आदेश क्र. कक्ष-4/कु.का-4/एसआर-27/2026 दिनांक – 24/08/2026. माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026. फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, लिहुन देणार:- शांताराम खंडु भालेराव (खाता क्रमांक :- 275)" भोगवटादार वर्ग – 2, इनाम वर्ग 6-ब यांचे गट क्रमांक 272 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार:- सागर श्रीधर आव्हाड (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क सह दु.नि. सिन्नर2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 4110 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 440000.00 घेउन खरेदी दिली. तसेच जिल्हाधिकारी कायांलय, नाशिक यांचा आदेश क्र. कक्ष-4/कु.का-4/एसआर-27/2026 दिनांक – 24/08/2026. आदेशात नमूद अटी व शर्ती खालील प्रमाणे.. 1. श्री. शांताराम खंडु भालेराव यांना सदरची जमीन श्री. सागर श्रीधर आव्हाड यांनाच विक्री करता येईल. 2. श्री. सागर श्रीधर आव्हाड हे सदरची मिळकत खरेदीनंतर कृषिक प्रयोजनार्थ भोगवटदार वर्ग-2 म्हणून नवीन अविभाज्य शर्तीवर व शेतीसाठीच धारण करतील. 3. खरेदीखतावर सर्व धारक / सहधारकांनी सहया कराव्यात. 4. सदर जमीन विक्री केल्यानंतर जमीन मालक भूमिहीन होत असल्यास भविष्यात शासनाकडे उदरनिर्वाहासाठी जमीन मागणी करता येणार नाही. 5. प्रस्तुतच्या जमिनीचा उपयोग बिनशेतीकडेस करणेपुर्वी सक्षम अधिकारी यांचेकडुन रितसर परवानगी घेणे बंधनकारक राहील. 6. प्रश्नाधिन जमिनीबाबत भविष्यात कोणत्याही हितसंबंधित व्यक्तीने या जमिनीच्या मालकी हक्काबाबत काही विवाद उपस्थित केल्यास व त्यामध्ये तथ्य आढळल्यास तसेच स्थळ पहाणीत जंमिनीचे हस्तांतरण आदेशापुर्वीच झाल्याचे आढळुन आल्यास परवानगी रद्य होण्यास पात्र राहील. 7. जमिनीचा विक्री व्यवहार आदेशाचे दिनांकापासुन पंधरा (15) दिवसानंतर तीन (03) महिन्याच्या आत करावा अन्यथा दिलेली परवानगी आपोआप व्यपगत होईल. 8. सदर गटात भूसंपादन झाले असल्यास क्षेत्र संबंधित यंत्रणेस देणे जमीन घेणार यांचेवर बंधनकारक राहील. 9. सक्षम प्राधिकारी यांचे पूर्व परवानगीशिवाय तुकडे पाडता येणार नाही. 10. प्रस्तुत मिळकतीचा उपयोग शेती व्यतीरिक्त अन्य प्रयोजनार्थ वापर करावयाचा असल्यास त्यावेळच्या प्रचलित बाजारभाव किंमतीच्या 50 टक्के अकृषीक नजराणा व पुर्वी भरणा केलेला कृषीक नजराणा रक्कम यातील फरकाची रक्कम शासनास भरणे बंधनकारक राहील, असा शेरा इतर अधिकारात घेणेत यावा. 11. प्रश्नाधीन मिळकतीबाबत दिवाणी अथवा महसुली न्यायालयामध्ये दावे प्रलंबित असल्यास सदर दाव्यामध्ये पारीत होणारे अंतिम निकाल जमीन देणार व जमीन घेणार यांचेवर बंधनकारक राहील. 12. प्रस्तुत जमिनीबाबत अर्जदार व खरेदीदार यांनी सदर प्रकरणामध्ये सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्यामध्ये काही त्रुटी आढळुन आल्यास अथवा खोटी माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास वा फौजदारी कार्यवाहीस पात्र राहतील. 13. सदर जमिनीचे साठेखतातील व्यवहाराची रक्कम रु.4,40,000/- ही व्यवहारासाठी किंमत निश्चित करणेत येत आहे. 14. प्रस्तावित व्यवहारात खालील कायद्याचे निर्बंध लागु रहातील. अ) महाराष्ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961 ब) मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन कायदा - 1948 क) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता कुळ वहिवाट विधी (सुधारणा) अधिनियम-1974(1974/35) ड) सदरची परवानगी फक्त याच कायद्याअंतर्गत देण्यात आली आहे. या संबंधात कुळ कायदा 48, नागरी जमिन (कमाल मर्यादा विनियमन) अधिनियम 1976, महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना कायदा 1966. वरील अटी व शर्ती च्या अधीन राहून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.