Ferfar #5539 · चितेंगांव
निफाड, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 230/1
- Talathi
- शेखर बाजीराव पाटील
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
श्री पंढरीनाथ सिताराम टर्ले व इतर यांचे बाजुस दाखल बाबत शेतमिळकतीचे मा तहसीलदार साहेब यांचे कडील आदेश क्र.आरटीएस/वाटप/एसआर 249/2026 दि.18/09/2026 प्राप्त झाले असून सदर गटाचे वाटप पत्र केले त्याचा तपशिल खालीलप्रमाणे...
ज्यांचे नावावर जमीन आहे त्यांचा तपशिल खालीलप्रमाणे....
1) पंढरीनाथ सिताराम टर्ले व इतर व :- गट नं.230/1 पै क्षेत्र 0.14.50 हे.आर.आकार 0.56 रु.पै.
2) कल्पना कैलास टर्ले व इतर व :- गट नं.230/1 पै क्षेत्र 0.08 हे.आर.आकार 0.30 रु.पै.
ज्यांचे नावावर वाटपाने जमीन करावयाचे आहे त्यांचा तपशिल खालीलप्रमाणे...
1)अलका पंढरीनाथ टर्ले यांस वाटपाने मौजे चितेगाव येथिल गट नं.230/1 पै क्षेत्र 0.14.50 हे.आर.आकार 0.56 रु.पै
2) अलका पंढरीनाथ टर्ले व इतर व :- गट नं.230/1 पै क्षेत्र 0.08 हे.आर.आकार 0.30 रु.पै
शेतमिळकती मध्ये असलेली सामाईक विहीर व इले.मो.पंप कांदाचाळ व घरांचे मिळकत अलका पंढरीनाथ टर्ले यांना वाटपानेदेण्यात आलेली आहे सदरचे मिळकतीमध्ये जाण्यायेण्यासाठी गटाचे दक्षिणेकडून पक्षिम असा नाल्याचा रस्ताअसुन वागवहिवाटीचे हक्कासह देण्यात आला आहे
अटी व शर्ती :-
1.सदर जमीनीचा 7/12 उतारा वेगळा करण्यात येऊ नये.
2.महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम खात्याचे वाटप नियम 1967 अन्वये वाटणीस आलेल्या जमीनीवर इतर हक्कांत जमीनीचे जे जे हक्क बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमीनी बरोबर संबंधित जमीन धारकांवरच राहील.
3.वरील शेतजमीनीचे मुंबई धारण जमीनीचे तुकडे पाड्यास प्रतिबंध व एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 अन्वये प्रमाणभुत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे विभाजन करता कामा नये. जमीनीचे वहिवाटदार एकत्रित व्हावयास पाहिजे.
4.ज्या शर्ती व ज्या वर्गातील मुळ जमीन असेल त्याच शर्तीवर (असल्यास) वर्गवारीत वाटप नंतर सदर जमीन राहील.
5.वर दिलेल्या प्रमाणे शेतसारा व इतर कर जमीन धारकाने भरावेत.
6.वाटपाप्रमाणे वाटपास आलेल्या जमीनीवर इतर हक्कांमध्ये जे जे हक्क बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमिनी बरोबर संबंधित धारकांवर बंधनकारक राहतील व त्याची जबाबदारी नविन धारकांवर राहील.
7.सदर शेतजमीनीतील पुर्वापार रस्त्यांची व इतर वहिवाट कायम राहिल.
8.सदरचे वाटपास सिलींग कायद्यातील तरतुदीस बाधा येणार नाही या अटीवर परवानगी देण्यात येत आहे.
9.सदर जमीन वाटपामुळे भुमीहिन झाल्यास शासनाकडे जमीनीची मागणी करता येणार नाही.
10.सदर जमीन वाटपमामुळे भुमीहिन झालेस अगर अल्पभुधारक झालेमुळे शासनाच्या सवलतींचा फायदा घेता येणार नाही.
11.सदरचे आदेशानुसार वाटप झालेले क्षेत्र तालुका निरिक्षक भुमी अभिलेख निफाड यांचेकडुन रितसर मोजणी करुन घेणे संबंधितांवर बंधन कारक राहिल.
12.सदर शेतजमिनीवर कोणत्याही बँकेचे कर्ज घेतले असेल तर ते कर्ज फेडण्याची जबाबदारी संबंधितांची राहिल. तसेच इतर अधिकारातील सर्व प्रकारचे बोजे कायम ठेवावेत.
13.अर्जदार व संमती देणार यांनी सदर जमीनीबाबत कोणत्याही न्यायालयात दावा दाखल नसल्याचे सांगितले आहे.
14.अर्जदार व संमती देणार यांनी सुनावणीस समक्ष हजर राहून वारसांबाबत दिलेल्या माहितीस ग्राह्य धरुन वाटप आदेश पारित करण्यात येत आहे. परंतू अर्जदार यांनी वारसांची व त्यानुषंगिक माहिती जाणीवपुर्वक लपवून ठेवल्याने भविष्यात वाद उद्भवल्यास किंवा न्यायालयात दावा दाखल झाल्यास सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहिल याची नोंद घ्यावी.
15. मा. उपविभागीय अधिकारी निफाड उपविभाग निफाड यांचेकडेस महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये प्रस्तुत आदेशाविरुद्ध दावा दाखल करुन दाद मागता येईल.
मा.तहसिलदार सो.निफाड यांचे कडीलपत्र क्र क्र.आरटीएस/वाटप/एसआर 249/2026 दि.18/09/2026नुसार नोंद केली असे.