Ferfar #7504 · शिरवाडेवणी
निफाड, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 716
- Talathi
- राहुल वाल्मिक अहिरे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : आरटीएस/वाटप/एस.आर/260/2026
आदेश दिनांक : 24/09/2026
बाजूस दाखल केलेल्या गट नंबर बाबत मा तहसिलदार साहेब निफाड यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये आदेश क्र.आरटीएस/वाटप/एस.आर/260/2026 निफाड दि 24/09/2026 रोजीचा आदेश आलेवरून खालीलप्रमाणे वाटप केले असे.
वाटप करून देणार – केदु राजाराम निफाडे
शिवाजी राजाराम निफाडे गट न.716पै क्षेत्र 0.10 हे आर आकार 0.20 रू.पै.
वाटप करून घेणार – आशाबाई भ्र.दिलीप निफाडे
विकी उर्फ विकास दिलीप निफाडे
श्री सागर दिलीप निफाडे गट न.716पै क्षेत्र 0.10 हे आर आकार 0.20 रू.पै.
सदर मिळकतीमध्ये असलेले पश्चिम उत्तर कोपऱ्यातील क्षेत्र 0.02.89 आर मध्ये पत्र्याचे घरांचे बांधकाम केलेले असून त्यांचा हक्क केदू राजाराम निफाडे यांनी राखून ठेवलेला आहे.शिवाजी राजाराम निफाडे यांनी त्यांचाअसलेला हक्क व अधिकार हा केदू राजाराम निफाडे यांच्या लाभात लिहून दिलेला आहे.
आदेशातील खालील अटी व शर्तीवर उपरोक्त प्रमाणे शेतजमीन विभाजनाची परवानगी देण्यात आली आहे.
1. सदर जमिनीचा 7/12 वेगळा करण्यात येऊ नये.
2. महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम 1967 अन्वये वाटणीस आलेल्या जमिनींवर इतर हक्काने जमिनीचे जे जे हक्क बंधने व नियंत्रण वाटपाच्या वेळी असतील ते सर्व जमिनी बरोबर संबंधित जमीन धारकांवरच राहतील.
3. वरील शेतजमिनीचे मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व एकत्रीकरण करण्याबात अधिनियम 1947 अन्वये प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे विभाजन करता कामा नये. जमिनीचे वहिवाट एकत्रित व्हावयास पाहिजे.
4. ज्या शर्थीवर व ज्या वर्गातील शेतजमीन असेल त्याच शर्थीवर व त्याच वर्गात विभाजना नंतर सदर जमीन राहील
5. वर दिलेल्या प्रमाणे शेतसारा व इतर कर जमीन धारकाने भरावा.
6. वाटपाप्रमाणे वाटणीस आलेल्या जमिनीवर इतर हक्कामध्ये जे जे हक्क बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमिनी बरोबर संबंधित जमीन धारकांवरच राहील.
7. सदर शेतजमिनीतील पूर्वापार रस्त्याची व इतर वहिवाट कायम राहतील..
8. सदरच्या वाटपास सिलिंग कायद्यातील तरतुदीस बाधा येणार नाही या अटीवर परवानगी देण्यात येत आहे
9. सदरच्या जमीन वाटपामुळे भूमिहीन झाल्यास शासनाकडे जमिनीची मागणी करता येणार नाही.
10. सदरच्या जमीन वाटपामुळे भूमिहीन झाल्यास अगर अल्प भूधारक झालेमुळे शासनाच्या सवलतीचा फायदा घेता येणार नाही.
11. सदरचे आदेशानुसार वाटप झालेले क्षेत्र तालुका निरीक्षक भूमी अभिलेख निफाड यांचेकडून रीतसर मोजणी करून घेणे संबंधितावर बंधनकारक राहील.
12. सदर शेतजमिनीवर कोणत्याही बँकेचे कर्ज घेअले असेल तर ते कर्ज फेडण्याची जबाबदारी संबंधितांची राहील. इतर हक्कातील शेरा व बोजे कायम ठेवावेत
13. अर्जदार व संमती देणार यांनी सदर जमिनी बाबत कोणत्याही न्यायालयात दावा दाखल नसल्याचे सांगितले आहे.
14. अर्जदार व संमती देणार यांनी समक्ष हजर राहून वारसांबाबत दिलेल्या माहितीस ग्राह्य धरून वाटप आदेश पारित करण्यात येत आहे. परंतु अर्जदार यांनी वारसांची किंवा त्या अनुषंगिक माहिती जाणीवपूर्वक लपवून ठेवल्याने भविष्यात वाद उद्भवल्यास किंवा न्यायालयात दावा दाखल झाल्यास सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहील याची नोंद घ्यावी.
15. मा. उपविभागीय अधिकारी निफाड उपविभाग निफाड यांचेकडेस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये प्रस्तुत आदेशाविरुद्ध दावा दाखल करून दाद मागता येईल.
आदेशातील अटी व शर्तीवर अधीन राहून वाटप केले असे. येणेप्रमाणे वाटपाचा आदेश आलेवरुन नोंद केली असे.