Ferfar #12227 · पालखेड
निफाड, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 918
- Talathi
- दत्ता कडु गोटे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र आरटीएस/कावि/293/2026
आदेश दिनांक : 19/10/2026
मा.तहसिलदार साहेब निफाड यांचे कडील आदेश क्र.आरटीएस /वाटप /एस आर/293/2026 निफाड दि.19/10/2026 रोजीचा आदेशानुसार म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार बाजूस दाखल केलेल्या जमीनिबाबत मौजे पालखेड ता.निफाड येथील जमिनीसाठी खालीलप्रमाणे वाटप केले असे.
वाटपा आधी मालक
किशोर दौलत थेटे गट न 918क्षेत्र 1.50.09 आकार 3.28 पैसे
वाटपा नंतरचे मालक
1) किशोर दौलत थेटे, गट न 918 पै क्षेत्र 0.70.09 आकार 1.54 पैसे
2) प्राची किशोर थेटे, गट न 918 पै क्षेत्र 0.80 आकार 1.74 पैसे
सदर शेतमिळकतीत एक विहीर असून त्यावरील इले मोटार असून ती किशोर व प्राची यांना सामाईक राहील. शेतमिळकतीत जाणेयेणेसाठी पूर्वापार रस्ते राहील.
अटी व शर्ती :-
१. सदर जमीनीचा ७/१२ उतारा वेगळा करण्यात येऊ नये,
२. महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम खात्याचे वाटप नियम १९६७ अन्वये वाटणीस आलेल्या जमीनीवर इतर हक्कांत जमीनीचे जे जे हक्क बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमीनी बरोबर संबंधित जमीन धारकांवरच राहील.
३. वरील शेतजमीनीचे मुंबई धारण जमीनीचे तुकडे पाड्यास प्रतिबंध व एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७ अन्वये प्रमाणभुत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे विभाजन करता कामा नये. जमीनीचे वहिवाटदार एकत्रित व्हावयास पाहिजे,
४. ज्या शर्ती व ज्या वर्गातील मुळ जमीन असेल त्याच शर्तीवर (असल्यास) वर्गवारीत वाटप नंतर सदर जमीन राहील.
५. वर दिलेल्या प्रमाणे शेतसारा व इतर कर जमीन धारकाने भरावेत.
६. वाटपाप्रमाणे वाटपास आलेल्या जमीनीवर इतर हक्कांमध्ये जे जे हक्क बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमिनी बरोबर संबंधित धारकांवर बंधनकारक राहतील व त्याची जबाबदारी नविन धारकांवर राहील.
७. सदर शेतजमीनीतील पुर्वापार रस्त्यांची व इतर वहिवाट कायम राहिल.
८. सदरचे वाटपास सिलींग कायद्यातील तरतुदीस बाधा येणार नाही या अटीवर परवानगी देण्यात येत आहे.
९. सदर जमीन वाटपामुळे भुमीहिन झाल्यास शासनाकडे जमीनीची मागणी करता येणार नाही.
१०. सदर जमीन वाटपमामुळे भुमीहिन झालेस अगर अल्पभुधारक झालेमुळे शासनाच्या सवलतींचा फायदा घेता येणार नाही.
११. सदरचे आदेशानुसार वाटप झालेले क्षेत्र तालुका निरिक्षक भुमी अभिलेख निफाड यांचेकडुन रितसर मोजणी करुन घेणे संबंधितांवर बंधन कारक राहिल.
१२. सदर शेतजमिनीवर कोणत्याही बँकेचे कर्ज घेतले असेल तर ते कर्ज फेडण्याची जबाबदारी संबंधितांची राहिल. तसेच इतर अधिकारातील सर्व प्रकार चे बोजे कायम ठेवावेत.
१३. अर्जदार व संमती देणार यांनी सदर जमीनीबाबत कोणत्याही न्यायालयात दावा दाखल नसल्याचे सांगितले आहे.
१४. अर्जदार व संमती देणार यांनी सुनावणीस समक्ष हजर राहून वारसांबाबत दिलेल्या माहितीस ग्राह्य धरुन वाटप आदेश पारित करण्यात येत आहे. परंतू अर्जदार यांनी वारसांची व त्यानुषंगिक माहिती जाणीवपूर्वक लपवून ठेवल्याने भविष्यात वाद उद्भवल्यास किंवा न्यायालयात दावा दाखल झाल्यास सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहिल याची नोंद घ्यावी.
१५. मा. उपविभागीय अधिकारी निफाड उपविभाग निफाड यांचेकडेस महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम २४७ अन्वये प्रस्तत आदेशाविरुद्ध दावा दाखक्रकेट मागता येईल.
मा तहसीलदार साहेब निफाड यांचेकडील आदेश आलेवरून नोंद केली असे.