सातबारा Watch

← पालखेड

Ferfar #12234 · पालखेड

निफाड, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
65/1
Talathi
दत्ता कडु गोटे
First seen
2d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र आरटीएस/वाटप/एसआर/307/2026 आदेश दिनांक : 03/11/2026 मा.तहसिलदार साहेब निफाड यांचे कडील आदेश क्र.आरटीएस /वाटप /एस आर/307/2026 निफाड दि.03/11/2026 रोजीचा आदेशानुसार म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार बाजूस दाखल केलेल्या जमीनिबाबत मौजे पालखेड ता.निफाड येथील जमिनीसाठी खालीलप्रमाणे वाटप केले असे. वाटपा आधी मालक यशवंत पुंडलिक होलगडे, गट नं 65/1, क्षेत्र 1.04 आर आकार 1.98 पैसे वाटपा नंतरचे मालक 1 ) प्रविण यशवंत होलगडे, गट नं 65/1, क्षेत्र 1.04 आर आकार 1.98 पैसे सदर शेत मिळकतीमध्ये असलेले सामाईक विहीर व इलेक्ट्रिक मोटर पंप पाईपलाईन यामध्ये वाटप पत्र लिहून ठेवणार नं 2 यांना क्षेत्राच्या मानाने पाणी घेण्याचे हक्कासह वाटप करण्यात आलेली आहे सदरच्या शेतमिळकतीमध्ये जाण्या येण्यासाठी पूर्वपारचा वागवहिवाटीचा रस्ता असून त्याच्या वागवहिवाटीच्या हक्कासह वाटप करण्यात आले आहे अटी व शर्तीं १. सदर जमीनीचा ७/१२ उतारा वेगळा करण्यात येऊ नये. २. महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम खात्याचे वाटप नियम १९६७ अन्वये वाटणीस आलेल्या जमीनीवर इतर हक्कांत जमीनीचे जे जे हक्क बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमीनी बरोबर संबंधित जमीन धारकांवरच राहील. ३. वरील शेतजमीनीचे मुंबई धारण जमीनीचे तुकडे पाड्यास प्रतिबंध व एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७ अन्वये प्रमाणभुत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे विभाजन करता कामा नये. जमीनीचे वहिवाटदार एकत्रित व्हावयास पाहिजे. ४. ज्या शर्ती व ज्या वर्गातील मुळ जमीन असेल त्याच शर्तीवर (असल्यास) वर्गवारीत वाटप नंतर सदर जमीन राहील. ५. वर दिलेल्या प्रमाणे शेतसारा व इतर कर जमीन धारकाने भरावेत. ६. वाटपाप्रमाणे वाटपास आलेल्या जमीनीवर इतर हक्कांमध्ये जे जे हक्क बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमिनी बरोबर संबंधित धारकांवर बंधनकारक राहतील व त्याची जबाबदारी नविन धारकांवर राहील. ७. सदर शेतजमीनीतील पूर्वापार रस्त्यांची व इतर वहिवाट कायम राहिल. ८. सदरचे वाटपास सिलींग कायद्यातील तरतुदीस बाधा येणार नाही या अटीवर परवानगी देण्यात येत आहे. सदर जमीन वाटपामुळे भुमीहिन झाल्यास शासनाकडे जमीनीची मागणी करता येणार नाही. ९. सदर जमीन वाटपमामुळे भुमीहिन झालेस अगर अल्पभुधारक झालेमुळे शासनाच्या सवलतींचा फायदा घेता येणार नाही. सदरचे आदेशानुसार वाटप झालेले क्षेत्र तालुका निरिक्षक भुमी अभिलेख निफाड यांचेकडुन रितसर मोजणी करुन घेणे संबंधितांवर बंधन कारक राहिल. १०. सदर शेतजमिनीवर कोणत्याही बँकेचे कर्ज घेतले असेल तर ते कर्ज फेडण्याची जबाबदारी संबंधितांची राहिल. तसेच इतर अधिकारातील सर्व प्रकारचे बोजे कायम ठेवावेत. ११. अर्जदार व संमती देणार यांनी सदर जमीनीबाबत कोणत्याही न्यायालयात दावा दाखल नसल्याचे सांगितले आहे. १२. अर्जदार व संमती देणार यांनी सुनावणीस समक्ष हजर राहून वारसांबाबत दिलेल्या माहितीस ग्राह्य धरुन वाटप आदेश पारित करण्यात येत आहे. परंतू अर्जदार यांनी वारसांची व त्यानुषंगिक माहिती जाणीवपुर्वक लपवून ठेवल्याने भविष्यात वाद उदभवल्यास किंवा न्यायालयात दावा दाखल झाल्यास सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहिल याची नोंद घ्यावी. १३. मा. उपविभागीय अधिकारी निफाड उपविभाग निफाड यांचेकडेस महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम २४७अन्वये प्रस्तुत आदेशाविरुद्ध दावा दाखल करुन दाद मागता येईल. मा तहसीलदार निफाड यांचेकडील आदेश आलेवरून नोंद केली असे.