Ferfar #11528 · खडक माळेगांव
निफाड, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 780/1
- Talathi
- जनार्धन सुखदेव उशीर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : आरटीएस/वाटप/एसआर/306/2026
आदेश दिनांक : 02/11/2026
बाजुस दाखल मिळकतीबाबत मा.तहसिलदार सो. निफाड यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/वाटप/एसआर/306/2026 निफाड दिनांक 02/11/2026 अन्वये मौजे खडकमाळेगांव ता. निफाड येथील गट नं. 780/1 क्षेत्र 0 हे 51 आर आकार 1 रु. 67 पैसे या गटांचे महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 व नियम 3 प्रमाणे आदेशात नमुद केलेल्या 1 ते 14 ह्या अटी व शर्ती अन्वये खालील प्रमाणे वाटप केले.
वाटणीपत्र करुन देणार :-
ज्योती बाळासाहेब शिंदे गट नं. 780/1 क्षेत्र 0 हे 51 आर आकार 1 रु. 67 पैसे
वाटणीपत्र करुन घेणार :-
शीतल बापुसाहेब शिंदे गट नं. 780/1 क्षेत्र 0 हे 51 आर आकार 1 रु. 67 पैसे
सदर मिळकतीस दगड, गोटे, जल, तरु, काष्ट पाषाण, निधी सामाईक रस्त्याचा वागवहिवाटीसह निक्षेपासह दरोबस्त मिळकत.
सदर शेतमिळकतीमध्ये असलेले सामाईक विहीर व इले. मो.पंप पाईपलाईन यामध्ये शीतल बापुसाहेब शिंदे यांना क्षेत्राचे मानाने पाणी घेण्याचे हक्कासह वाटप करण्यात आलेली आहे. सदरचे शेतमिळकतीमध्ये जाण्यायेण्यासाठी पुर्वापारचा वागवहिवाटीचा रस्ता असुन त्याचे वागवहिवाटीचे हक्कांसह वाटप करण्यात आले आहे.
येणे प्रमाणे मा.तहसिलदार सो.निफाड यांचे कडील आदेश क्रमांक आरटीएस/वाटप/एसआर/306/2026 निफाड दिनांक 02/11/2026 गावी हजर झाले वरुन नोंद दाखल केली असे.
आदेशातील अटी व शर्ती :-
1.सदर जमीनीचा 7/12 उतारा वेगळा करण्यात येऊ नये.
2.महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम खात्याचे वाटप नियम 1967 अन्वये वाटणीस आलेल्या जमीनीवर इतर हक्कांत जमीनीचे जे जे हक्क बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमीनी बरोबर संबंधित जमीन धारकांवरच राहील.
3.वरील शेतजमीनीचे मुंबई धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 अन्वये प्रमाणभुत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे विभाजन करता कामा नये. जमीनीचे वहिवाटदार एकत्रित व्हावयास पाहिजे.
4.ज्या शर्ती व ज्या वर्गातील मुळ जमीन असेल त्याच शर्तीवर (असल्यास) वर्गवारीत वाटप नंतर सदर जमीन राहील.
5.वर दिलेल्या प्रमाणे शेतसारा व इतर कर जमीन धारकाने भरावेत.
6.वाटपाप्रमाणे वाटपास आलेल्या जमीनीवर इतर हक्कांमध्ये जे जे हक्क बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमिनी बरोबर संबंधित धारकांवर बंधनकारक राहतील व त्याची जबाबदारी नविन धारकांवर राहील.
7.सदर शेतजमीनीतील पुर्वापार रस्त्यांची व इतर वहिवाट कायम राहिल.
8.सदरचे वाटपास सिलींग कायद्यातील तरतुदीस बाधा येणार नाही या अटीवर परवानगी देण्यात येत आहे.
9.सदर जमीन वाटपामुळे भुमीहिन झाल्यास शासनाकडे जमीनीची मागणी करता येणार नाही. सदर जमीन वाटपमामुळे भुमीहिन झालेस अगर अल्पभुधारक झालेमुळे शासनाच्या सवलतींचा फायदा घेता येणार नाही.
10.सदरचे आदेशानुसार वाटप झालेले क्षेत्र तालुका निरिक्षक भुमी अभिलेख निफाड यांचेकडुन रितसर मोजणी करुन घेणे संबंधितांवर बंधन कारक राहिल.
11.सदर शेतजमिनीवर कोणत्याही बँकेचे कर्ज घेतले असेल तर ते कर्ज फेडण्याची जबाबदारी संबंधितांची राहिल. तसेच इतर अधिकारातील सर्व प्रकारचे बोजे कायम ठेवावेत.
12.अर्जदार व संमती देणार यांनी सदर जमीनीबाबत कोणत्याही न्यायालयात दावा दाखल नसल्याचे सांगितले आहे.
13.अर्जदार व संमती देणार यांनी सुनावणीस समक्ष हजर राहून वारसांबाबत दिलेल्या माहितीस ग्राह्य धरुन वाटप आदेश पारित करण्यात येत आहे. परंतु अर्जदार यांनी वारसांची व त्यानुषंगिक माहिती जाणीवपुर्वक लपवून ठेवल्याने भविष्यात वाद उद्भवल्यास किंवा न्यायालयात दावा दाखल झाल्यास सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहिल याची नोंद घ्यावी.
14. मा. उपविभागीय अधिकारी निफाड उपविभाग निफाड यांचेकडेस महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये प्रस्तुत आदेशाविरुद्ध दावा दाखल करुन दाद मागता येईल.
मा. तहसिलदार सो. यांचे कडील आदेश गावी हजर झाले वरुन नोंद दाखल केली असे. वरीलप्रमाणे आदेश दप्तरी दाखल असे.