सातबारा Watch

← दहेगांव

Ferfar #1514 · दहेगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
रविंद्र लक्ष्मण भांगरे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 अधिकारी : सह आयुक्त (पुनर्वसन) विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक आदेश क्रमांक : क्र. आरटीएस/अपील/१५०/२०२४ आदेश दिनांक : 01/07/2026 बाजूस दाखल मौजे दहेगाव येथील गट नं. ४ (क्षेत्र- १.११ हे. आर) ही जमीन देवस्थान इनाम वर्ग-3 ची असून सदर जमिनीवर सध्या मारुती देवस्थान दहेगाव व्यतिरिक्त भवानीगिर बिसनगीर गोसावी, मिनाबाई तान्हाजी गोसावी, सिनाबाई रामदास गोसावी, भावगीर रमेशगिर गोसावी, लताबाई रमेशगिर गोसावी, शांता आबाजी गोसावी, शिवगीर रमेशगिर गोसावी, शोभा विठ्ठल गोसावी इत्यादी नावे आहेत. सदर मिळकतीबाबत तहसीलदार निफाड यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ अन्वये क्र. कुक/केस ०३/२०२१ दि. २२/११/२०२१ रोजी आदेश पारित केला होता. सदर आदेशान्वये सदर गटावर झालेली वारस फेरफार नोंद क्र. ७१९ रद्द करणेत आली. यानंतर सदर आदेशावर उपविभागीय अधिकारी निफाड यांचेकडे क्र. आरटीएस/अपील/४०/२०२२ अन्वये अपील दाखल करणेत आले. यानंतर उपविभागीय अधिकारी निफाड यांनी दि. १९/०१/२०२४ रोजी यावर निकाल देत सदर अपील फेटाळून लावले व तहसीलदार निफाड यांचा दि. २२/११/२०२१ चा आदेश कायम करणेत आला. तसेच सदर वाद मिळकत हि देवस्थान इनाम वर्ग-३ ची असल्याने शासन परिपत्रक कर. डीईव्ही-२०१०/प्र.क्र..९/ल-४, दिनांक ३० जुलै २०१० तसेच शुद्धीपत्रक क्र. यांनतर उपविभागीय अधिकारी निफाड यांचे आदेशावर डीईव्ही-२०१०/प्र.क्र.९/ल-४, दि. २९ जून, २०११ अन्वये महसुली प्राधिकारी अथवा अधिकारी यांना दिशानिर्देश दिलेले आहेत, त्यानंतर राज्यातील देवस्थानच्या जमिनीची तपासणी तसेच या जमिनी बेकायदेशीर हस्तांतरित झाल्या असल्यास पूर्ववत देवस्थान च्या नावे करण्याबाबत पूरक दिशानिर्देश दि. ०६ नोव्हेंबर, २०१८ रोजी शासन परिपत्रक क्र. डीईव्ही-२०१५/प्र. क्र. १५१/ज-१अ नुसार काढण्यात आलेले आहेत. त्यानुसार भोगवटदार सदरी केवळ देवस्थान चे नाव कायम ठेवून वहिवाटदार व इतर नावे कमी करणे आवश्यक आहे असा निष्कर्ष नोंदविला होता. यानंतर उपविभागीय अधिकारी निफाड यांच्या आदेशाच्या विरोधात सह आयुक्त (पुनर्वसन) विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक यांचेकडे अपील करणेत आले. सदर अपिलात क्र. आरटीएस/अपील/१५०/२०२४ दि. ०१/०७/२०२६ अन्वये निकाल देत सह आयुक्त (पुनर्वसन) विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक यांनी सदरचे अपील फेटाळून देत तहसीलदार निफाड व उपविभागीय अधिकारी निफाड यांचा निकाल कायम करणेत आला असे. वरील प्रमाणे सह आयुक्त (पुनर्वसन) विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक यांचे आदेशावरोन नोंद केली असे.