Ferfar #7677 · धारणगांव खडक
निफाड, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 382
- Talathi
- वैशाली किरण गायकवाड
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : आरटीएस/वाटप/एसआर/274/2026
आदेश दिनांक : 08/10/2026
बाजुस दाखल मिळकतीबाबत मा.तहसिलदार सो. निफाड यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/वाटप/एसआर/274/2026 निफाड दिनांक 08/10/2026 अन्वये मौजे धारणगांव खउक ता. निफाड येथील गट नं. 382 पैकी क्षेत्र 2 हे 34 आर आकार 7 रु. 26 पैसे या गटांचे महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 व नियम 3 प्रमाणे आदेशात नमुद केलेल्या 1 ते 15 या अटी व शर्ती अन्वये खालील प्रमाणे वाटप केले.
वाटणी पत्र करुन देणार :-
वाल्मिक काशिनाथ सानप, योगिता प्रकाश ऊर्फ फकिरा सानप, योगिता प्रकाश ऊर्फ फकिरा सानप, बाळु काशिनाथ सानप, प्रियंका प्रकाश ऊर्फ फकिरा सानप, निर्मला प्रकाश ऊर्फ फकिरा सानप, जिजाबाई छबु आव्हाड, साळुबाई पांडुरंग भाबड, आकाश प्रकाश ऊर्फ फकिरा सानप गट नं. 382 पैकी क्षेत्र 2 हे 34 आर आकार 7 रु. 26 पैसे
वाटणी पत्र करुन घेणार :-
1) निर्मला फकिरा सानप, आकाश फकिरा सानप गट नं. 382 पैकी पुर्वपश्चिम बांध टाकुन उत्तरेकडील क्षेत्र 1 हे 00 आर आकार 3 रु. 10 पैसे
2) बाळु काशिनाथ सानप गट नं. 382 पैकी पुर्व पश्चिम बांध टाकुन पश्चिमेकडील क्षेत्र अर्थात दक्षिण पश्चिम कोपऱ्यातील वाल्मिक सानप यांचे वाटपास दिलेले 0.34 आर क्षेत्र वगळुन क्षेत्र 1 हे 00 आर आकार 3 रु. 10 पैसे
3) वाल्मिक काशिनाथ सानप गट नं. 382 पैकी पश्चिम व दक्षिण कोपऱ्यातील क्षेत्र 0 हे 34 आर आकार 1 रु. 05 पैसे
गट नं. 382 मध्ये पश्चिम दक्षिण कोपऱ्यात एक विहीर व इले मोटार असुन वाल्मिक यांचे वाटपास आलेली आहे. तर बाळु यांचे वाटपास जे क्षेत्र आले आहे त्यात एक विहीर व इले मोटार असुन ती बाळु यांची राहील. सदर मिळकतीत जाणेयेणेसाठी गटाचे पश्चिमेचे बाजुने दक्षिणोत्तर धारणगांव खडक – बोकडदरे या नावे रस्ता असुन त्याद्वारे जाणेयेणेचा उभयतांचा हक्क राहील.
येणे प्रमाणे मा.तहसिलदार सो.निफाड यांचे कडील आदेश क्रमांक आरटीएस/वाटप/एसआर/274/2026 दिनांक 08/10/2026 गावी हजर झाले वरुन नोंद दाखल केली असे.
आदेशातील अटी व शर्ती :-
1.सदर जमीनीचा 7/12 उतारा वेगळा करण्यात येऊ नये.
2.महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम खात्याचे वाटप नियम 1967 अन्वये वाटणीस आलेल्या जमीनीवर इतर हक्कांत जमीनीचे जे जे हक्क बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमीनी बरोबर संबंधित जमीन धारकांवरच राहील.
3.वरील शेतजमीनीचे मुंबई धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 अन्वये प्रमाणभुत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे विभाजन करता कामा नये. जमीनीचे वहिवाटदार एकत्रित व्हावयास पाहिजे.
4.ज्या शर्ती व ज्या वर्गातील मुळ जमीन असेल त्याच शर्तीवर (असल्यास) वर्गवारीत वाटप नंतर सदर जमीन राहील.
5.वर दिलेल्या प्रमाणे शेतसारा व इतर कर जमीन धारकाने भरावेत.
6.वाटपाप्रमाणे वाटपास आलेल्या जमीनीवर इतर हक्कांमध्ये जे जे हक्क बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमिनी बरोबर संबंधित धारकांवर बंधनकारक राहतील व त्याची जबाबदारी नविन धारकांवर राहील.
7.सदर शेतजमीनीतील पुर्वापार रस्त्यांची व इतर वहिवाट कायम राहिल.
8.सदरचे वाटपास सिलींग कायद्यातील तरतुदीस बाधा येणार नाही या अटीवर परवानगी देण्यात येत आहे.
9.सदर जमीन वाटपामुळे भुमीहिन झाल्यास शासनाकडे जमीनीची मागणी करता येणार नाही.
10.सदर जमीन वाटपमामुळे भुमीहिन झालेस अगर अल्पभुधारक झालेमुळे शासनाच्या सवलतींचा फायदा घेता येणार नाही.
11.सदरचे आदेशानुसार वाटप झालेले क्षेत्र तालुका निरिक्षक भुमी अभिलेख निफाड यांचेकडुन रितसर मोजणी करुन घेणे संबंधितांवर बंधन कारक राहिल.
12.सदर शेतजमिनीवर कोणत्याही बँकेचे कर्ज घेतले असेल तर ते कर्ज फेडण्याची जबाबदारी संबंधितांची राहिल. तसेच इतर अधिकारातील सर्व प्रकारचे बोजे कायम ठेवावेत.
13.अर्जदार व संमती देणार यांनी सदर जमीनीबाबत कोणत्याही न्यायालयात दावा दाखल नसल्याचे सांगितले आहे.
14.अर्जदार व संमती देणार यांनी सुनावणीस समक्ष हजर राहून वारसांबाबत दिलेल्या माहितीस ग्राह्य धरुन वाटप आदेश पारित करण्यात येत आहे. परंतु अर्जदार यांनी वारसांची व त्यानुषंगिक माहिती जाणीवपुर्वक लपवून ठेवल्याने भविष्यात वाद उद्भवल्यास किंवा न्यायालयात दावा दाखल झाल्यास सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहिल याची नोंद घ्यावी.
15. मा. उपविभागीय अधिकारी निफाड उपविभाग निफाड यांचेकडेस महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये प्रस्तुत आदेशाविरुद्ध दावा दाखल करुन दाद मागता येईल.
मा. तहसिलदार सो. यांचे कडील आदेश गावी हजर झाले वरुन नोंद दाखल केली असे. वरीलप्रमाणे आदेश दप्तरी दाखल असे.