सातबारा Watch

← खेडलेझुंगे

Ferfar #5131 · खेडलेझुंगे

निफाड, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
347/अ
Talathi
दिपक रमेश पवार
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : मा. तहसीलदार, निफाड यांचे आदेश क्र. आरटीएस/वाटप/एसआर/२८६/२०२६, दिनांक १५/१०/२०२६ आदेश दिनांक : 15/10/2026 मौजे खेडलेझुंगे, ता. निफाड, जि. नाशिक येथील गट नं. ३४७/अ, क्षेत्र ०.६० हे.आर., आकार रु. २.०८ या मिळकतीचे कब्जेदार १) संदिप रामनाथ घोटेकर व २) संतोष रामनाथ घोटेकर, रा. खेडलेझुंगे, ता. निफाड, जि. नाशिक यांनी सदर जमिनीचे वाटप होण्यासाठी मा. तहसीलदार, निफाड यांचेकडे अर्ज सादर केला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ८५ अन्वये तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीचे विभाजन) नियम, १९६७ मधील तरतुदींनुसार अर्जाची कार्यवाही करण्यात आली. त्यानुसार मा. तहसीलदार, निफाड यांचे आदेश क्र. आरटीएस/वाटप/एसआर/२८६/२०२६, दिनांक १५/१०/२०२६ अन्वये सदर गटाचे वाटप मंजूर करण्यात आले आहे. सदर आदेशानुसार वाटप देणारे व घेणार १) संदिप रामनाथ घोटेकर यांचे नावे असलेल्या गट नं. ३४७/अ मधील क्षेत्र ०३० हे.आर. संपूर्ण ०.३० हे.आर. क्षेत्र आदित्य संदिप घोटेकर यांना व २) संतोष रामनाथ घोटेकर यांचे नावे असलेल्या गट नं. ३४७/अ मधील क्षेत्र ०३० हे.आर.संपूर्ण ०.३० हे.आर. क्षेत्र प्रसाद संतोष घोटेकर यांना वाटप करण्यात आले आहे. ३४७/अ पै. मध्ये एक विहीर व इलेक्ट्रिक मोटर असून सदर विहीर प्रसाद यांचे गटात येत असून त्यामध्ये आदित्य व प्रसाद यांचा सामायिक हिस्सा राहील. तसेच विहिरीवर जाणेयेण्यासाठी पाऊलवाट ठेवण्यात आली आहे. सदर वाटपानुसार संबंधित लाभार्थ्यांची नावे व त्यांना वाटप झालेल्या क्षेत्राची नोंद मा. तहसीलदार, निफाड यांच्या आदेशाप्रमाणे संबंधित महसूल अभिलेखात घेण्यासाठी हा फेरफार दाखल करण्यात येत आहे.