सातबारा Watch

← चाटोरी

Ferfar #7923 · चाटोरी

निफाड, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
554/1
Talathi
योगेश विलास तातपुरकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : कलम ९८-ब/जबाबदारी निश्चित/जप्ती बोजा नोंद/सन २०२६ आदेश दिनांक : 30/09/2026 वसुली अधिकारी, सायखेडा नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सायखेडा, ता. निफाड (अवसायनात) तथा सहकार अधिकारी (प्र.श्रे.) अधीन मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था निफाड यांच्याकडील हुकूम जा.क्र. कलम ९८-ब/जबाबदारी निश्चित/जप्ती बोजा नोंद/सन २०२६, दिनांक ३०/०९/२०२६ अन्वये मौजे चाटोरी, ता. निफाड येथील मिळकतीवर खालीलप्रमाणे जप्ती बोजा व हस्तांतरण मनाई आदेशाची नोंद घेण्यात येत आहे: सायखेडा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सायखेडा (अवसायनात) या संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ अन्वये झालेल्या चौकशीत अपचारी ठरवून कलम ९८ अन्वये निश्चित केलेल्या आर्थिक नुकसानीच्या वसुलीपोटी, जबाबदार व्यक्ती श्री. सोमनाथ बाळकृष्ण नवले (रा. सायखेडा, ता. निफाड) यांच्याकडून येणे असलेली रक्कम रुपये १८,१५,३९१/- (अक्षरी रुपये अठरा लाख पंधरा हजार तीनशे एक्याण्णव फक्त) ची वसुली होईपावेतो, त्यांच्या मालकीच्या मौजे चाटोरी येथील गट नं. ५५४/१ या मिळकतीवर जप्ती हुकूम जारी करण्यात आला आहे: वरील हुकुमानुसार, मौजे चाटोरी येथील गट नं. ५५४/१ ही मिळकत वरील जबाबदार व्यक्ती अथवा त्यांचे वारस यांनी पुढील आदेश होईपर्यंत इतर कोणासही तबदील करण्यास, गहाणवट/बोजा करण्यास, बक्षीस देण्यास, खरेदी-विक्री करण्यास, विकसित करण्यास, बांधकाम करण्यास अथवा कोणत्याही प्रकारे हस्तांतरणाने स्वीकृत करण्यास किंवा तारणापोटी बोजा चढवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तरी वरील वसुली हुकुमावरून मौजे चाटोरी येथील गट नं. ५५४/१ च्या अधिकार अभिलेखात (७/१२ उताऱ्यावर) इतर हक्कात, सायखेडा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सायखेडा (अवसायनात) यांच्या वसुली हुकूम क्र. ९८-ब, दि. ३०/०९/२०२६ अन्वये रु. १८,१५,३९१/- रकमेचा जप्ती बोजा सोमनाथ बाळकृष्ण नवले करिता अशी नोंद घेण्यात आली असे, आदेश दप्तरी दाखल असे.