सातबारा Watch

← चाटोरी

Ferfar #7928 · चाटोरी

निफाड, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
14/अ, 315, 319, 41
Talathi
योगेश विलास तातपुरकर
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आरटीएस/कावि/९०२/२०२६ आदेश दिनांक : 16/10/2026 मे. तहसीलदार, निफाड यांच्याकडील आदेश क्रमांक आरटीएस/कावि/९०२/२०२६ दिनांक १६/१०/२०२६ अन्वये, मौजे चाटोरी, ता. निफाड येथील खालील नमूद मिळकतींच्या ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकारातून नाव कमी करून ते कब्जेदार सदरी दाखल करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत: मौजे चाटोरी येथील गट नं. १४/अ, ४१, ३१५ व ३१९ या मिळकतींवर मयत दामोधर सखाराम हांडगे यांची वारस नोंद फेरफार नं. २४६४ अन्वये प्रमाणित झालेली आहे. सदर फेरफार नोंदीनुसार इतर अधिकारात दाखल असलेले मुलगी सुरेखा बबन मोगल (रा. कोठुरे, ता. निफाड) यांचे नाव, मा. राज्य समन्वयक ई-फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे यांच्या मार्गदर्शक सूचना व महाराष्ट्र जमीन महसूल अभिलेख व नोंदवह्या नियम १९७१ मधील तरतुदींनुसार इतर अधिकारातून कमी करून कब्जेदार सदरी (भोगवटादार सदरी) दाखल करण्यात येत आहे. समाविष्ट मिळकती: मौजे चाटोरी: गट नं. १४/अ, गट नं. ४१, गट नं. ३१५ व गट नं. ३१९ कब्जेदार सदरी दाखल नाव: सुरेखा बबन मोगल त्यानुसार मौजे चाटोरी येथील वरील चारही गटांच्या अधिकार अभिलेखात इतर हक्कातून सुरेखा बबन मोगल यांचे नाव कमी करून, मे. तहसीलदार निफाड यांच्या आदेशानुसार ते कब्जेदार सदरी सहखातेदार म्हणून दाखल करण्यासाठी ही फेरफार नोंद घेण्यात येत आली व आदेश दप्तरी दाखल असे.