Ferfar #5670 · तामसवाडी
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
हुकुमनामा
बाजुस दाखल केलेल्या मौजे तामसवाडी ता.निफाड येथील गट नं. 482 , 484/1 , 484/2 , 483 , 475 या शेतजमीनीबाबत निफाड येथील मे. सिव्हील जज्ज सो.ज्यु.डी यांचेकडील रे.मु.नं 322/2026 हुकुमनामा वाटप दाव्याचे कामी वादी श्री महेंद्र बाबुराव क्षिरसागर व प्रतिवादी रुख्मीणीबाई बाबुराव क्षिरसागर, भगवान बाबुराव क्षिरसागर , सुनंदा सोमनाथ वाघचौरे, वैशाली विष्णु गारे यांचे दरम्यान आपसांत समजुत होवून सुलेहनामा झालेवरुन मौजे तामसवाडी ता.निफाड येथील वरील गटांचे वाटपपत्र झाले त्याचा तपशिल खालीलप्रमाणे
1. मौजे तामसवाडी ता.निफाड जि.नाशिक येथील शेतजमीन गट नं 483 क्षेत्र 0.52 आर पोट खराबा 0.06आर आकार 1.94 पैसे , तसेच गट नं 484/1 क्षेत्र 0.32 आर पोट खराबा 0.10 आर आकार 0.82 पैसे , गट नं 482 क्षेत्र 0.13 आर दक्षिणेकडील पोट खराबा 0.01 आर आकार 0.33 पैसे , गट नं 484/2 पश्चिम दक्षिण कोपरा क्षेत्र 0.12 आर आकार 0.30 पैसे ही मिळकत वादी महेंद्र बाबुराव क्षिरसागर यांचे हिश्यास देण्यात आले आहे.
2. प्रतिवादी नं रुख्मीणीबाई बाबुराव क्षिरसागर यांना गट नं 484/2 पैकी क्षेत्र 0.10 आर पोट खराबा 0.0850 आर आकार 0.25 पैसे , गट नं 484/1 पैकी क्षेत्र 0.10 आर पोट खराबा क्षेत्र 0.0850 आर आकार 0.25 पैसे वाटपाने देण्यात आलेली आहे.
3. प्रतिवादी नं 2 यांना गट नं 482 पैकी उत्तरेकडील क्षेत्र 0.63 आर पोट खराबा 0.04 आर आकार 1.61 पैसे , गट नं 484/2 पैकी उत्तरेकडील क्षेत्र 0.30 आर पोट खराबा 0.10 आर आकार 0.77 पैसे , गट नं 484/1 पैकी उत्तर कोपरा क्षेत्र 0.10 आर आकार 0.25 पैसे , गट नं 475 पैकी क्षेत्र 0.07 आर पोट खराबा 0.04 आर आकार 0.09 पैसे ही मिळकत वाटपाने देण्यात आलेली आहे.
4. प्रतिवादी नं 3 सौ सुनंदा सोमनाथ वाघचौरे यांना गट नं 484/1 पुर्व उत्तर कोपरा क्षेत्र 0.15 आर पोट खराबा 0.05 आर आकार 0.40 पैसे ही मिळकत वाटपाने देण्यात आलेली आहे.
5. प्र.वादी नं 4 सौ वैशाली विष्णु गारे यांना गट न 484/2 दक्षिण पुर्व कोपरा क्षेत्र 0.15 आर पोट खराबा 0.05 आर आकार 0.40 पैसे ही मिळकत वाटपाने देण्यात आलेली आहे.
सदर गट नं 482 मधील सामाईक विहीर आहे , सदर विहीरीमध्ये वादी , प्रतिवादी नं 2 यांचा निम्मा निम हिस्सा आहे व सदर समजुतीनुसार आठवड्याच्या पाळ्या करुन घेऊन त्यानुसार पाण्याचा वापर करावयाचा आहे.
निफाड येथील मे. सिव्हील जज्ज सो.ज्यु.डी यांचेकडील रे.मु.नं 322/2026 चे हुकुमनाम्यावरुन केली असे.