Ferfar #2490 · मानोरी बुद्रूक
येवला, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 185
- Talathi
- विजय पंढरीनाथ सोनवणे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 973/2024
आदेश दिनांक : 30/12/2025
) मौजे मानोरी बु. येथील गट नं. १८५ क्षेत्र ०.५८ आर हे सन २००६-२००९ व २०१६-१७ सालात मूळ मालक विठ्ठल भाऊराव शेळके यांच्या नावे होते. विठ्ठल भाऊराव शेळके हे दिनांक २२/१०/२००८ रोजी मयत झाल्यानंतर फेरफार नोंद नं. १६१० दिनांक १७/०८/२००९ अन्वये अर्जदार व इतर वारसांची नावे गट नं. १७० व गट नं. १८५ या मिळकतीच्या अधिकार अभिलेखात दाखल झाली आहे.2) संगणकीकृत ७/१२ उतारा तयार करताना तलाठी यांनी श्री. लक्ष्मण बाबुराव शेळके हे दिनांक २४/१२/२०१० रोजी मयत झाल्याने त्यांचे वारस सौ. सुनंदा लक्ष्मण शेळके, भाऊसाहेब लक्ष्मण शेळके, अनुसयाबाई लक्ष्मण शेळके, सुमनबाई लक्ष्मण शेळके यांची नावे फेरफार नोंद नं. १६७२ अन्वये गट नं. १८, १३२, २२९, २३० या मिळकतीच्या अधिकार अभिलेखात घेतली.परंतु फेरफार नोंद नं. १६७२ चा अंमल घेताना संबंधित तलाठी यांनी सामाईक गट नं. १८५ वरील अर्जदार यांचे नाव कमी करून मयत लक्ष्मण बाबुराव शेळके यांचे वारसांची नावे गट नं. १८५ वर दाखल केली आहे. वास्तविक फेरफार नोंद नं. १६७२ मध्ये गट नं. १८५ चा उल्लेख नसतानाही त्यावर संबंधित तलाठी यांनी नजर चुकीने मयत लक्ष्मण बाबुराव शेळके यांचे वारसांचा अंमल घेतला आहे. सदर वारसांचा व अर्जदार यांच्या वारसांचा काहीही संबंध नाही.म्हणून मा.तहसीलदार साहेब यांच्या १५५च्या आदेश क्र.कु.का./कावी /९७३ /२०२४ अन्वये नोंद संपादित केली असे