Ferfar #6934 · मुखेड
येवला, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/08/2026
मौजे मुखेड येथील गट नंबर 86 मध्ये जाणे येण्यासाठी व मालवाहतूक करण्यासाठी गट नंबर 85/1चे मालक बंडू लक्ष्मण शिंदे व म्हाळू लक्ष्मण शिंदे यांच्या क्षेत्रातून पश्चिम बांधाने उत्तरेकडून दक्षिणेकडे 145 फूट लांब व 85/2 चे मालक रावसाहेब धोंडीबा शिंदे यांच्या वाटणीतून 125 फूट लांबीचा असा एकूण 270 फुट लांबीचा व 10 फूट रुंदीचा वहिवाटी रस्ता निरंतर करारनाम्याने दस्त क्रमांक 5032 /2012 दिनांक 9/10/ 2012 अन्वये त्रंबक कारभारी कांदळकर यांनी वहिवाटी रस्ता घेतला होता. त्यानंतर त्र्यंबक कारभारी कांदळकर यांनी गट नंबर 86 चे संपूर्ण क्षेत्र हे सुनीता तुकाराम कांगणे खरेदी दस्त क्रमांक 1287/ 2014 व तुकाराम एकनाथ कांगणे खरेदी दस्त क्रमांक 2413/2017 नुसार या दोघांना वर नमूद केलेल्या वर्णनाच्या रस्त्यासह विक्री केले आहे. सदर खरेदीदारांच्या नावाचा अंमल सातबारावर दाखल झाला आहे परंतु वर वर्णन केलेल्या रस्त्यांचा अंमल गट नंबर 85/1 व 85/2 मध्ये झालेला दिसून येत नाही म्हणून सदर रस्त्याचा अंमल घेणे कामी नोंद घेतली असे.नोंद अर्ज,करारनामा दस्त, खरेदी दस्त यावरून केली असे. कागदपत्रे दफ्तरी ठेवली असे