सातबारा Watch

← पन्हाळसाठे

Ferfar #669 · पन्हाळसाठे

येवला, नाशिक · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
47/1/अ/5
Talathi
योगिता हनुमान निकम
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026मौजे पन्हाळसाठे ता.येवला जि.नाशिक येथील शेतजमीन गट नंबर 47/1/अ/5 क्षेत्र 02 हे. 10 आर, आकार 0 रु.44 पैसे या अर्जदार श्री.विजयश हरीभाऊ केकाण रा.जेऊर पाटोदा ता.कोपरगाव जि.अहिल्यानगर यांचे मालकीची शेतजमीन ही जमीन महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 अंतर्गत अतिरिक्त जमीन नोंद नंबर 58 सन 1976 अन्वये वाटप करणेत आली आहे. प्रश्नाकीत जमिनीचे मुळ मालक श्री.विजयश हरीभाऊ केकाण यांनी दिनांक 01 सप्टेंबर 2026 रोजी अर्ज देऊन भोगवटदार वर्ग 2 च्या जमिनीस भोगवटदार वर्ग 1 करणेस परवानगी मिळणेकामी विनंती केली आहे. त्यानुसार म.अप्पर जिल्हाधिकारी सो., जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांनी आदेश क्र.कक्ष-4/कुका-3/अति.ज.मो.-1/एसआर-37/2026/ई-3631149 दिनांक :- 12/10/2026 अन्वये अर्जदार श्री.विजयश हरीभाऊ केकाण रा.जेऊर पाटोदा ता.कोपरगाव जि.अहिल्यानगर यांचे मालकीची मौजे पन्हाळसाठे ता.येवला जि.नाशिक येथील शेतजमीन गट नंबर 47/1/अ/5 क्षेत्र 02 हे. 10 आर, आकार 0 रु.44 पैसे भोगवटदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणेस खालील अटी व शर्तीस अधीन राहुन परवानगी दिलेली आहे. अटी व शर्ती खालीलप्रमाणे :- 1) अर्जदार श्री.विजयश हरीभाऊ केकाण हे वर नमूद मिळकत ही भोगवटदार वर्ग 1 म्हणुन धारण करतील. 2) प्रस्तुतच्या जमीनीचा उपयोग बिनशेती कडेस करावयाची असल्यास सक्षम अधिकारी यांचेकडून आवश्यक त्या परवानगी घेणे बंधनकारक राहील. 3) भविष्यात लेखापरीक्षणात रूपांतरण अधिमुल्य कमी वसुल केलेबाबत शक निघाल्यास त्यानुसार सदरची रक्कम सर्व संबंधिताना भरणे अनिवार्य राहील. तसेच भरणा करणेत आलेला रूपांतरण अधिमुल्य रक्कम कोणत्याही सबबीवर परत मागता येणार नाही. अन्यथा सदरची परवानगी आदेश आपोआप व्यपगत होतील, या अधिन राहून सदरची परवानगी देण्यात येत आहे. 4) प्रस्तुत मिळकत संस्था/फर्म/कंपनीस विकण्यापुर्वी महाराष्ट्र कुळवहिवाट व महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 63 अन्वये सक्षम अधिकारी यांची पुर्व परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील. 5) अर्ज मिळकतीचे सक्षम अधिकारी यांचे पुर्व परवानगी शिवाय तुकडे पाडता येणार नाही. 6) सदर गटात भूसंपादन झाले असल्यास भूसंपादीत क्षेत्र संबंधित यंत्रणेस देणे जमीन मालक यांचेवर बंधनकारक राहील. 7) अर्ज मिळकतीच्या मालकी हक्काबाबत कोणत्याही महसुली अथवा दिवाणी न्यायालयात वाद प्रलंबित असल्यास, सदर प्रलंबित न्यायालयीन प्रकरणात संबंधित न्यायालयाकडून पारीत होणारे आदेश अर्ज मिळकतीचे हस्तांतरण व मालकी हक्कावर बंधनकारक राहतील. 8) प्रस्तुत जमिनीबाबत अर्जदार जमीन मालक यांनी सदर प्रकरणामध्ये सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास वा खोटी माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यास व सदरची प्रश्नाधिन भविष्यात कोणत्याही हितसंबंधित व्यक्तीने या जमिनीच्या मालकी हक्काबाबत काही विवाद उपस्थित केल्यास व त्यामध्ये काही तथ्य आढळल्यास तसेच स्थळ पाहणीत जमिनीचे हस्तांतरण आदेशापुर्वीच झाल्याचे आढळून आल्यास किवा जमीन मालकाचे त्रयस्थ इसमाबरोबर साठेखत करून व्यवहारापोटी रक्कम स्वीकारलेली असल्याचे साठेखत लिहून घेणार यांनी निदर्शनास आणुन दिल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास पात्र राहील. 9) सदरची परवानगी ही फक्त महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 या कायद्याअंतर्गत भोगवटदार वर्ग 2 ची जमीन आहे ही बाब केवळ विचारात घेऊन शासन अधिसूचना 4 मे, 2026 मधील तरतुदीनुसार सदर जमीन भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरण करणेस परवानगी देण्यात आली आहे. या संबंधात कुळ कायदा 1948, नागरी जमीन (कमाल मर्यादा विनियमन) अधिनियम 1976, महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना कायदा 1966 किवा अन्य कोणत्याही कायद्यानुसार वा नियमानुसार परवानगी घेणे जर आवश्यक असेल तर तशी परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील. वरील पैकी कोणत्याही अटी अगर शर्तीचा भंग झाल्यास व चौकशी अंती तसे निष्पन्न झाल्यास सदरची परवानगी रद्द होणेस व शास्तीस पात्र राहील. बाबत म.अप्पर जिल्हाधिकारी सो., जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांचेकडील आदेश क्र.कक्ष-4/कुका-3/अति.ज.मो.-1/एसआर-37/2026/ई-3631149 दिनांक :- 12/10/2026 अन्वये मौजे पन्हाळसाठे ता.येवला जि.नाशिक येथील शेतजमीन गट नंबर 47/1/अ/5 क्षेत्र 02 हे. 10 आर, आकार 0 रु.44 पैसे भोगवटदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणेत आले आहे.