सातबारा Watch

← भिंगारे

Ferfar #1207 · भिंगारे

येवला, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
बापु रामसिंग पाटील
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026मौजे भिंगारे, ता. येवला येथील गट नं. 51, एकूण क्षेत्र ०1 हे. 33 आर,पो ख 0 हे 30 आर एकूण 1 हे 63 आर आकार रु. 5.37 पैसे ही शेतजमीन भूतपूर्व कनिष्ठ गाव नोकर वतन इनाम वर्ग ६-ब ची असून, सन १९५८ च्या इनाम निर्मूलन कायद्यानुसार इनाम सदरातून खालसा करून वतनदारांना नवीन अविभाज्य शर्तीवर देण्यात आलेली होती . सदर मिळकतीचे मूळ खातेदार/धारक १) निर्मला वाल्मिक झाल्टे , २) योगेश वाल्मिक झाल्टे , ३) राणी वाल्मिक झाल्टे यांनी सदर जमीन कृषिक प्रयोजनार्थ विक्री करणेकामी सक्षम प्राधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली होती. त्याअनुषंगाने मा. अपर जिल्हाधिकारी, नाशिक यांचे आदेश जावक क्र. कक्ष-4/कु.का-2/एसआर-190/2026, दिनांक 12/10/2026 अन्वये सदर जमीन रिग्रॅन्ट करून खालील खरेदीदारांना पुढील अटी व शर्तीस अधीन राहून कृषिक प्रयोजनार्थ विक्री करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. तदनंतर सह दुय्यम निबंधक कार्यालय, येवला येथील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र.5462/2026 दिनांक 16/10/2026 व सह दुय्यम निबंधक येवला यांचेकडील सूची नं. २ अन्वये सदर मिळकतीचा व्यवहार पूर्ण झालेला आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे लिहुन देणार:- १) निर्मला वाल्मिक झाल्टे , २) योगेश वाल्मिक झाल्टे , ३) राणी वाल्मिक झाल्टे - - -रा. भिंगारे(खाता क्रमांक 406) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 51, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3300 हे.आर.चौ.मी पो ख 0 हे 30 आर एकूण 1 हे 63 आर आकार रु. 5.37 पैसे पैकी गट न 50 चे लगत पश्चिम बाजूचे दक्षिण उत्तर लांबीचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खाली दिलेल्या अटी व शर्ती नुसार लिहुन घेणार : क्षितिजा समाधान बोराडे , (खाता क्रमांक :- 531)गट/सर्व्हे क्रमांक 51 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक येवला जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5462 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1035000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर खालील अटी व शर्ती नुसार दाखल केले असे. अटी व शर्ती :- 1. सौ.निर्मला वाल्मिक झाल्टे, श्री. योगेश वाल्मिक झाल्टे व राणी वाल्मिक झाल्टे यांनी सदरची जमीन श्रीमती. क्षितीजा समाधान बोराडे यांनाच विक्री करता येईल. 2. खरेदीदार श्रीमती. क्षितीजा समाधान बोराडे हे सदरची मिळकत खरेदीनंतर नविन अविभाज्य शर्तीवर व शेतीप्रयोजनार्थ धारण करतील. 3. सदर मिळकत ज्या आदेशान्वये शर्तीवर रिग्रँट करण्यात आली त्या आदेशातील अटी व शर्ती कायम राहील. 4. खरेदीखतावर सर्व जमीन मालकांनी सह्या कराव्यात. 5. शेती व्यतिरिक्त अन्य प्रयोजनार्थ जमिनीचा वापर करावयाचा झाल्यास अकृषिक मुल्यांकनाच्या 50 टक्के इतकी रक्कम व पुर्वी भरणा केलेल्या शेतसा-याच्या 10 पट नजराणा यातील फरका इतकी रक्कम शासनास भरणा करणे बंधनकारक राहील असा शेरा 7/12 उता-याचे इतर हक्कात घेण्यात यावा. 6. प्रश्नाधिन जमीनीबाबत भविष्यात कोणत्याही हितसंबंधित व्यक्तीने या जमिनीच्या मालकी हक्काबाबत काही विवाद उपस्थित केल्यास व त्यामध्ये तथ्य आढळल्यास तसेच स्थळ पहाणीत जमिनीचे हस्तांतरण आदेशापुर्वीच झाल्याचे आढळुन आल्यास परवानगी रद्द होण्यास पात्र राहील. 7. जमिनीचा विक्री व्यवहार या आदेशाच्या दिनांकापासून तीन महिन्यांपर्यंत नोंदणीकृत करण्यात यावा अन्यथा दिलेली परवानगी आपोआप व्यपगत होईल. 8. अर्ज मिळकतीचे सक्षम प्राधिकारी यांचे पुर्व परवानगी शिवाय तुकडे पाडता येणार नाही. 9. सदर गटात भूसंपादन झाले असल्यास भूसंपादित क्षेत्र संबंधित यंत्रणेस देणे जमीन घेणार यांचेवर बंधनकारक राहील. 10. अर्ज मिळकतीबाबत दिवाणी अथवा महसूली न्यायालयामध्ये दावे प्रलंबित असल्यास सदर दाव्यांमध्ये पारीत होणारे अंतिम निकाल जमीन देणार व जमीन घेणार यांचेवर बंधनकारक राहील. 11. सदर जमीन विक्री केल्यानंतर जमीन मालक भुमिहिन होत असल्यास भविष्यात शासनाकडे उदरनिर्वाहासाठी जमीन मागणी करता येणार नाही. 12. प्रस्तुत जमिनीबाबत अर्जदार व खरेदीदार यांनी सदर प्रकरणामध्ये सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्यामध्ये काही त्रुटी आढळुन आल्यास वा खोटी माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास वा फौजदारी कारवाईस पात्र राहतील. 13. सदर जमिनीचे साठेखतातील गट.नं.51 रक्कम रु.10,35,000/- आहे व दुय्यम निबंधक, येवला यांचेकडील मुल्यांकनाची रक्कम रु.10,33,280/- इतकी आहे. मुल्यांकनातील रक्कमेपेक्षा साठेखताची रक्कम अधिक असल्याने साठेखताची रक्कम रु.10,35,000/- ही जमीनीची किंमत निश्चित करणेत येत आहे. जमीन मालक यांचे नावे ही रक्कम धनादेशाद्वारे राष्ट्रीयकृत बँकेत जमा करावी व बँकेचे खात्यात रक्कम जमा असल्याबाबतचे प्रमाणपत्र खरेदीखतामध्ये समाविष्ट करावे. त्याशिवाय दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणीकृत करु नये. 14. तहसीलदार येवला / ग्राम महसूल अधिकारी भिंगारे यांनी जमिन मालक यांचे नावे यापुर्वी अदा केलेली रक्कम खातेदारांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत त्यांचे समक्ष खाते उघडून धनादेशाव्दारे रक्कम अदा झाल्याची खात्री करावी. त्याशिवाय अधिकार अभिलेखात खरेदी विक्री व्यवहाराची फेरफार नोंद करु नये. 15. प्रस्तावित व्यवहारात खालील कायद्याचे निर्बंध लागु रहातील. अ) महाराष्ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961. ब) महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन कायदा - 1948 क) इतर कायदयाच्या तरतुदी ड) सदरची परवानगी फक्त याच कायद्याअंतर्गत देण्यात आली आहे. या संबंधात कुळ कायदा 1948, नागरी जमिन (कमाल मर्यादा विनियमन) अधिनियम 1976, महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना कायदा 1966 किंवा अन्य कोणत्याही कायद्यानुसार वा नियमानुसार परवानगी घेणे जर आवश्यक असेल तर तशी परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील. वरील पैकी कोणत्याही अटी अगर शर्तींचा भंग झाल्यास, व चौकशी अंती तसे निष्पन्न झाल्यास सदरची परवानगी रद्द करणेस व शास्तीस पात्र राहील. वरील अट क्र 3 व 5 चा शेरा इतर अधिकारात घेऊन नोंद केली असे.