सातबारा Watch

← अंगुलगांव

Ferfar #3002 · अंगुलगांव

येवला, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
182/1, 182/2
Talathi
कावेरी राजेंद्र वाघ
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्जदार जिजाबाई वामन वर्पे यांनी अर्ज दिला की, मौजे अंगुलगाव शिवारातील शेतजमीन याचा गट नंबर 182/1 यापैकी लिहून घेणार जिजाबाई वामन वर्पे यांचे मालकीचे लागवड योग्य क्षेत्र 1 हेक्टर 67 आर पो. ख. क्षेत्र 0 हेक्टर 52 आर आकार 0 रु 92 पैसे या शेतजमीन मिळकतीचे पूर्वी गट नंबर 182 त्यात विहीर एक सामाईक मालकीची आहे. सामाईकात लिहून देणार राजाराम काळू जाधव व लिहून देणार यांचे भाऊ दत्तात्रय काळू जाधव यांचा प्रत्येकी 1/2 हिस्सा आहे. सदर गट नंबर 182 चे दोघा भावांमध्ये वाटप होऊन गट नंबर 182/1 हा हिस्सा दत्तात्रय काळू जाधव यांच्या वाटणीस गेला व तो गट नंबर 182/1 हा लिहून घेणार जिजाबाई वामन वर्पे यांनी खरेदी केला असून क्षेत्रासह सामाईक विहिरीतील 1/2 हिस्सा हा सह दुय्यम निबंधक येवला यांचे कडील दस्त क्रमांक 2182/2023 दिनांक 15/05/2023 अन्वये राजाराम काळू जाधव यांनी खरेदी केला आहे. सबब गट नंबर 182/1 मधील सामाईक विहिरीत लिहून देणार राजाराम काळु जाधव यांचा असलेला 1/2 हिस्सा कायम आहे तोच विहिरीतील लिहून देणार राजाराम काळू जाधव यांचा 1/2 हिस्सा लिहून घेणार जिजाबाई वामन वर्पे यांना सह दुय्यम निबंधक येवला यांचेकडील नोंदणीकृत खरेदी दस्त क्रमांक 742/2024 दिनांक 13/02/2024 अन्वये रक्कम रुपये 100000/- मोबदला देऊन कायम खरेदी दिला आहे. त्याचे वर्णन सदर गटातील पश्चिमेकडील नाल्यापासून सुमारे 50 फूट अंतरावर असलेली सामाईक विहिरीतील लिहून देणार राजाराम काळू जाधव यांचा 1/2 हिस्सा लिहून घेणार जिजाबाई वामन वर्पे यांना या खरेदीखत लेखाने कायम खरेदी दिला आहे. सदर वाटणीतील विहिरीत लिहून घेणार जिजाबाई वामन वर्पे यांनी 1/2 हिस्सा खरेदी घेतल्यानंतर सदर वाटणीतील विहीर एक स्वतंत्र झाली आहे. तरी गट नंबर 182/2 या जमिनीचे इतर हक्कात दाखल असलेली गट नंबर 182 यामधील विहिरीत राजाराम यांचा 1/2 हिस्सा ही नोंद कमी करण्यास लिहून देणार राजाराम काळू जाधव यांची पूर्ण संमती असून त्यांची कोणतीही हरकत नाही असे दस्तामध्ये नमूद केले आहे. सबब गट नं 182 मधील विहिरीत राजाराम याचा 1/2 हिस्सा हा शेरा कमी केला असे. तसेच गट नं 182/1 चे इतर अधिकारात सदर गटातील पश्चिमेकडील नाल्यापासून सुमारे 50 फुट अंतरावर असलेली विहीर एक स्वतंत्र यामध्ये जिजाबाई वामन वर्पे यांचा संपूर्ण हिस्सा राहील हा शेरा दाखल केला असे. अर्ज, सह दुय्यम निबंधक येवला यांचेकडील नोंदणीकृत खरेदी खत दस्त क्रमांक 742/2024 दिनांक 13/02/2026 चे सूची क्रमांक दोन वरून नोंद केली असे.