सातबारा Watch

← अंदरसुल

Ferfar #9252 · अंदरसुल

येवला, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2025-06-24
Objection until
2025-07-10
Certified
—
Gat / Survey
849/अ
Talathi
श्रीकिसन बाबुराव तिडके
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/06/2025# फेरफाराचा दिनांक:- 24/06/2025 खरेदी ( सेल सर्टिफिकेट ) मा.तहसिलदार सो येवला यांचे कडील कुळवहीवाट व शेतजमीन चे अधीनियम 1948 कलम 32 - (ग ) अन्वये कुळकायदा केस क्रमांक -06/2010 येवला दिनांक 25/04/2022 चे निकालपत्र व मा . उपविभागीय अधिकारी साहेब येवला यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/ टेनन्सी केस नं 66/2022 दिनांक 03/02/2025 व मा . उपविभागीय अधिकारी साहेब येवला, यांचेकडील दुरुस्तीपत्रक क्रमांक आरटीएस/ टेनन्सी केस नं 66/2022 दिनांक 10/02/2025 . मा.तहसिलदार सो येवला यांचे कार्यालयाकडील पत्र कु.का./कावि /522/ दिनांक- 08/05/2025 व मा.तहसिलदार सो येवला यांचे कडील मुंबई कुळवहीवाट व शेतजमीन चे अधीनियम 1948 कलम 32- ( म ) नुसार खरेदी प्रमाणपत्र क्र कु.का.केस.क्रं32 -ग /697/2025 केस क्रमांक -06/2010 दिनांक- 11/06/2025 अन्वये मौजे अंदरसुल ता. येवला पैकी गट नं 849/अ क्षेत्र 9.42 हे .आर पो.ख. 00 हे 31 हे आर आकार 18.94 चे पैकी कब्जेदार सदरी असलेले रामभाऊ दामू साताळकर यांचे क्षेत्र 3.00 हे आर आकार 6.03 रु पै व रमेश दामू साताळकर व संजय रामचंद्र नागपुरे, विठ्ठल रामचंद्र नागपुरे यांच्या सामाईक मालकीचे क्षेत्र 6.42 हे आर पो ख 0.31 हे आर आकार 12.91 रु पै या जमिनीचे विठ्ठल तुळशीराम साताळकर व इतर 11 स. कृषक दिनीकुळ हे कुळ ठरविले आहेत. मुंबई कुळवहीवाट व शेतजमीन चे अधिनियम 1948 कलम 32- के याच्या उपबधान्वये कुळ विठ्ठल तुळशीराम सातळकर व इतर 11 यांस उक्त जमीनीची किंमत म्हणुन रुपये 12993/- अनामत ठेवणे बाबत फर्मावनेत आले होते. त्यानुसार त्यांनी ती सदरची रक्कम चलनाने दिनाक 31/05/2025 रोजी भारतीय स्टेट बँक शाखा येवला येथे भरणा केली आहे . त्याअर्थी उक्त कुळ विठ्ठल तुळशीराम साताळकर व इतर 11 हे उक्त मुंबई कुळवहीवाट व शेतजमीन चे अधीनियमाचे कलम 32- म यांच्या उपबंधान्वये उक्त जमीनीचे खरेदीदार आहे. मा.तहसिलदार सो येवला यांचे कडील नमूना 8 नियम 18 नुसार मुंबई कुळवहीवाट व शेतजमीन चे अधीनियम 1948 कलम 32- म नुसार खरेदी प्रमाणपत्र क्र कु.का.के.क्रं32 -ग /697/2025 केस क्रमांक -06/2010 दिनांक- 11/06/2025 टेनन्सी केस नं 66/2022 दिनांक 10/02/2025 कुळवहीवाट व शेतजमीन चे अधिनियमाचे कलम 32- म नुसार खरेदी प्रमाणपत्र निर्गमीत करुन दुय्य्मे निबंधक येवला यांचे कार्यालयाकडील नोंदणी क्र 3013/2025 दिनांक 13/06/2025 करुन खरेदी देण्यासाठी प्रचलित शासन आदेश व नियमानुसार महाराष्ट्र शासनातर्फे प्राधिकृत अधिकारी शेतजमीन न्यायाधिकरण तथा तहसिलदार येवला करिता विद्यमान ग्राम महसूल अधिकारी श्री श्रीकिसन बाबुराव तिडके मौजे-अंदरसूल ता. येवला यांना खरेदी देण्यासाठी नियुक्त केले आहे . सदर नोंदणीकृत खरेदी प्रमाणपत्रात ( सेल सर्टिफिकेट ) मध्ये खरेदी घेणार म्हणून नमूद 1) पंढरीनाथ मुरलीधर साताळकर 2) कचरु मुरलीधर साताळकर 3) लहानबाई अशोक साताळकर 4) सुनिल अशोक साताळकर 5) संतोष अशोक साताळकर 6) उत्तम तुळशीराम साताळकर 7) विठ्ठल तुळशीराम साताळकर 8) सरुबाई सावळीराम साताळकर 9) शिवाजी सावळीराम साताळकर 10) सुधाकर सावळीराम साताळकर 11) संजय सावळीराम साताळकर 12) भास्कर देवराम साताळकर यांना खरेदी दिलेने त्यांची नांवे कब्जेदार सदरी दाखल केले व इतर अधीकारात " महाराष्ट्र कुळवहीवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 अन्वये नियंत्रीत सत्ता प्रकार " हा शेरा दाखल केला. भुधरणा पद्धती सदरी भोगवटादार वर्ग - 2 व इतर अधिकारात नवीन अविभाज्य शर्त कायम ठेवण्यात आले. मा.तहसिलदार सो येवला यांचे कडील मुंबई कुळवहीवाट व शेतजमीन चे अधीनियम 1948 कलम 32- म नुसार खरेदी प्रमाणपत्र क्र कु.का.के.क्रं32 -ग /697/2025 केस क्रमांक -06/2010 दिनांक- 11/06/2025, टेनन्सी केस नं 66/2022 दिनांक-10/02/2025 . दुय्यम निंबधक येवला जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3013 दिनांक 13/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 12993 घेऊन खरेदी दिली सूची क्रमांक-2 वरोन नोंद केली. कागद दप्तरी अपत्रक फाईल केले असे.