Ferfar #1570 · आगवन
डहाणू, पालघर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 612
- Talathi
- सुचिता श्रावण सांबार
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
बाजूस दाखल केलेल्या स.न.हि.न.च्या जमिनीवर आज रोजी शफीउलहक अब्दुलवहाब खान व इतर यांच्या नावे दाखल असून हरेश्वर मांगता माच्छी रा. आगवन ता. डहाणू यांनी मा.उप विभागीय अधिकारी डहाणू विभाग डहाणू यांच्या कार्यालयात मौजे आगवन येथील स.न.हि.न. ६१२ क्षेत्र- १.२०.३० हे.आर व पो.ख. ०.०८.५० हे.आर या जमिनीवरील नि.स.प्र.कु.का.क 43 ची शर्त शिथिल करण्याबाबत अर्ज दाखल केला होता सदर अर्जान्वये मा. उप विभागीय अधिकारी डहाणू विभाग डहाणू यांनी त्याच्या कडील आदेश क्र.डीपी/टेनन्सी/४३/एसआर/१५/२००४ दि. २३/०४/२००४ दिल्याने त्या बाबत अर्जदार यांनी नजराणा चलन क्रमांक – २०/२००४ दिनांक – २३/०४/२००४ अन्वये रक्कम रुपये ५६/-( रुपये छपन्न मात्र) शासन जमा केलेली असल्याने वरील मिळकती वरील नि.स.प्र.कु.का.क. १९४८ चे कलम ४३ ची शर्त शिथिल केली असे. त्याबाबत अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत.
१) वरीलप्रमाणे विक्रीचा व्यवहार वरील दोन पक्षकारामध्येच ह्या आदेशाचे तारखेपासून एक वर्षाचे आत पूर्ण करणेचा आहे.
२) जमिन विकत घेणारे यांनी वरील जमिनीचा वापर प्रकरणात नमूद केलेले म्हणजेच “शेती प्रयोजनार्थ” या कारणासाठी करणेचा आहे.
३) जर वरील जमिन सन १९७४ व १९७५ चे आदिवासीना जमिन देण्याच्या कायदयान्वये बाधित होत असेल अथवा सदारचे जमिनी बाबत कोणत्याही दिवाणी न्यायालयात वाद चालू असेल तर ही परवानगी आपोआप रद्द झाली आहे असे समजण्यात यावे.
४) वरील व्यवहाराने सध्या कागदपत्रावर नोंद नसलेली कोणतीही व्यक्तीचे हक्कात बाधा येत असेल तर दोन्ही पक्षकार (जमिन खरेदीदार /विक्री करणारे) हे जबाबदार राहतात.
५) वरील जमिनीचा नियोजित कारणासाठी वापर करण्यास प्रचलित नियमाप्रमाणे बिनशेती अथवा इतर परवानग्या घेणे (आवश्यक असल्यास ) हे जमिन खरेदीदार यांचेवर बंधनकारक आहे. तसेच नियोजित कारणासाठी जमिनीचा ताबा घेतल्या तारखेपासून एक वर्षाचे आत वापरण्याचे बंधन खरेदीदार यांचेवर आहे.
६) सदरची जमिन खरेदीदार यांनी या कार्यालयाचे पूर्व परवानगीशिवाय कोणासही विक्री, गहाण, दान, अथवा बक्षीसपत्राने हस्तातरीत करणेनाही .
७) जमिन शेतीसाठी खरेदी होत असल्याने जमिन विकत घेणारे इसमास कमाल जमिन धारणा कायद्यानुसार निर्धारित केलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त जमिन होईल अश्या तऱ्हेने जमिन विकत घेता येणार नाही.
८) नियोजित कारणासाठी जमिनीचा वापर करतेवेळी सांडपाण्याची व्यवस्था तसेच विद्युत शक्तीचा पुरवठा वगैरे याची खरेदीदार यांनी स्वखर्चाने करावयाचा आहेत.
९) वरील शर्तीशिवाय कुळकायदा कलम ४३/६३ व त्याखालील नियम खरेदीदार यांचेवर बंधनकारक राहील.
१०) वरीलपैकी कोणत्याही शर्तीचे अथवा नियमांचे उल्लंघन झाल्यास ही परवानगी रद्द होण्यास पात्र ठरेल व खरेदीदार यांचे विरुद्ध मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम ८४(क) प्रमाणे कारवाई केली जाईल.
वरील अटी व शर्तीला अधिन राहून बाजूस दाखल सर्वे न/गट क्र. वरील नि.स.प्र. नोंद कमी केली असे.
(नोंद- मा. उप विभागीय अधिकारी डहाणू विभाग डहाणू यांनी त्याच्या कडील पत्र क्र.डीपी/टेनन्सी/४३/एसआर/१५/२००४ दि. २३/०४/२००४ वरून नोंद केली असे.)