Ferfar #212 · शेणसरी
डहाणू, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
बाजूस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन ईश्वर जान्या बोरसा व इतर यांचे नावे दाखल आहे. सदर जमिनीबाबत राजु सदानंद बोरसा व इतर यांनी म.ज.म.अ.1966 चे कलम 247 प्रमाणे मौजे शेणसरी, तालुका डहाणू येथील फेरफार क्रमांक 4 रद्द करणेबाबत मा. सहाय्यक जिल्हाधिकारी डहाणू विभाग डहाणू जिल्हा पालघर यांचेकडे अपिल दाखल केलेले होते. सदर अपिलाचा निर्णय मा. सहाय्यक जिल्हाधिकारी डहाणू विभाग डहाणू जिल्हा पालघर यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक डीपी/आरटीएस./अपिल क्रमांक 41/2026 दिनांक 09/06/2026 रोजी पारित केलेला आहे. सदर आदेशानुसार 1) अपिलकार यांचे अपिल मान्य करण्यात येत आहे. 2) मौजे- शेणसरी, तालुका डहाणू, जिल्हा पालघर येथील फेरफार क्रमांक 4 रद्द करण्यात येत आहे. तसेच सदर जमिनीबाबत विवेचनात नमूद केल्याप्रमाणे संबंधित सर्व महसूल अभिलेख यांचे अवलोकन करून सदर जमिनीचे खातेदार कै. जान्या (जानू )वनश्या बोरसा यांचे सर्व कायदेशीर वारसांचे नावाची नोंद 7/12 सदरी घेणेबाबत आवश्यक ती नियमानुसार कार्यवाही करावी. असे आदेश पारित केले आहेत. त्यामुळे 7/12 सदरी असलेली नावे दामू मनू बोरसा, सिता बंदू बोरसा, सोनी लक्ष्मण महाकाल, शकुंतला परशुराम बोरसा, अजय परशुराम बोरसा, आकाश परशुराम बोरसा यांची नावे कायम ठेवून ईश्वर जान्या बोरसा व इतर यांची नावे कमी करून जानू वनश्या बोरसा यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले आहे.
गट क्रमांक क्षेत्र (हे.आर.चौ.मी.)
85 1.64.30
91 1.17.10
107 0.65.00
105 0.18.00
83 0.30.30
नोंद :- माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी सो. डहाणू यांचे कडील आदेश क्र. डीपी/आरटीएस/अपिल क्रमांक 41/2026 दिनांक 09/06/2026 लगत माननीय तहसीलदार डहाणू यांच्याकडील पत्र क्र./महसूल/हक्कनोंद/कावि 1350/2026 दिनांक- 16/06/2026 अन्वये नोंद केली असे.