Ferfar #466 · सोमनाथ
डहाणू, पालघर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/5/2
- Talathi
- वि. एम. शिंदे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/09/2026
बाजूस नमूद केलेल्या स.नं. हि.नं.चे खातेदार रावजी शिडवा रावत्या यांनी सदर स. नं. च्या जमिनीच्या ७/१२ अभिलेखातील इतर अधिकार सदरी असलेली नियंत्रित सत्ता प्रकार/कु.का.क.४३ ला पात्र अशी नोंद कमी करून मिळावी यासाठी मा. तहसिलदारसाहेब, डहाणू यांच्या कार्यालयाकडे अर्ज केला होता. त्याकरीता मा. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, शासन परिपत्रक क्र.टीएनसी४/१३/प्र.क्र.१९६/ज१/मुंबई, दि.११/०२/२०१४ अन्वये कुळकायद्यातील तरतुदीनुसार कुळांना ज्या जमीनीची कु.का.क. ३२ ग अन्वये विक्री होऊन दहा वर्षांचा काळ लोटला असेल तिचे हस्तांतरण करण्यासाठी खालील शर्तीस अधीन राहून कु.का.क. ४३ अन्वये मा. जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगीची आवश्यकता असणार नाही
१.सदर जमिनीची कु.का.क. ३२ ग अन्वये विक्री नंतर १० वर्षे झाले असावेत,
२.जमिनीच्या आकाराच्या ४० पात इतकी नजराणा रक्कम अर्जदारांनी शासनाला भरावी,
३.खरेदीदार हा महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम १९६१ अन्वये अनुज्ञेय असलेल्या क्षेत्रापेक्षा अधिक जमीन धारण करणार नाही,
४.मुंबईचा जमिनीचे तुकडे पाडण्यास व एकत्रीकरण करण्याबाबतचा अधिनिअयम १९४७ च्या अटींचे उल्लंघन होणार नाही.
त्यानुसार सदर जमिनीची कु.का.क. ३२ ग अन्वये विक्री १० वर्षापूर्वी झालेली असून अर्जदारांनी जमिनीच्या आकाराच्या ४० पट म्हणजे र.रु.३०१/- मात्र चलनाद्वारे भरल्याबाबत नोंद घेऊन व सदर परवानगीसाठी उपरोक्त अटींचे पालन होत असल्याची खात्री करून मा. तहसिलदारसाहेब, डहाणू यांनी त्यांचेकडील आदेश क्र.टेनंसी/विप/एसआर३९४/२०२६, दि. ०६/०४/२०२६ अन्वये सदर ७/१२ मधील नियंत्रित सत्ता प्रकार/कु.का.क.४३ ला पात्र अशी नोंद कमी करण्याचा आदेश दिला आहे. करीता, सदर ७/१२ च्या इतर अधिकारमधील नियंत्रित सत्ता प्रकार/कु.का.क.४३ ला पात्र अशी नोंद कमी केली व भूधारणा वर्ग १ केली.