सातबारा Watch

← वरोर

Ferfar #1337 · वरोर

डहाणू, पालघर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
750/37
Talathi
हितेश यज्ञेश्वर राऊत
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बाजूस दाखल केलेली जमीन आज रोजी श्रीम. कल्पना बाळू सालवी यांचे नावे चालत आहे. सदर जमिनीबाबत श्रीमती. मंजु भुपेश वांगड वै.3 ( अपिलकार ) यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधि 1966 चे कलम 247 अन्वये मा. सहाय्यक जिल्हाधिकारी डहाणू विभाग डहाणू जि.पालघर याचे न्यायालयात दावा दाखल केलेला होता. सदर दाव्यात वेळोवेळी सुनावणी होऊन मा. सहाय्यक जिल्हाधिकारी डहाणू विभाग डहाणू जि.पालघर यांनी दि.01/04/2026 रोजी आदेश क्र.डीपी/आरटीएस/अपिल क्र.20/2026 अन्वये खालील प्रमाणे आदेश पारीत केलेले आहे. 1) अपिलकार यांचे अपिल विलंब माफीच्या अर्जासह मान्य करण्यात येत आहे. 2) मौजे – वरोर, ता. डहाणू, जि. पालघर येथील फेरफार क्र. 956 रद्द करण्यात येत आहे. तसेच जमिनीबाबत तहसीलदार डहाणू यांनी उपरोक्त विवेचनात नमुद केलेप्रमाणे संबधित सर्व महसुल अभिलेख यांचे अवलोकन करून सदर जमिनीचे खातेदार कै. धनजी काकड्या वांगड यांचे सर्व कायदेशीर वारसांचे नावाची नोंद सातबारा सदरी घेणेबाबत आवश्यक ती नियमानुसार कार्यवाही करावी. 3) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही. 4) सदरचा आदेश संबंधिताना कळविण्यात यावा. वरील प्रमाणे आदेश पारीत झाल्याने फेरफार क्र. 956 रद्द करणेत येत आहे.