सातबारा Watch

← दहिसर तर्फे तारापूर

Ferfar #2921 · दहिसर तर्फे तारापूर

पालघर, पालघर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
136/31/1, 136/39
Talathi
आरती उत्तम सावंत
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मौजे दहिसर तर्फे तारापूर गट क्र. 136/31/1 क्षेत्र 0.40.00 हे. आर व गट क्र.136/39 क्षेत्र 0.40.00 हे. आर हि जमीन ध्वनी परीमल शाह व इतर यांचे नावे सामाईक दाखल आहे. सदर जमीन भोगवटादार वर्ग-2 नविन अविभाज्य शर्तीची असून सदर जमीन शासन अधिसूचना दि.04/03/2025 नुसार देय रुपांतरण अधिमुल्य रक्कम भरणा करून भोगवटादार वर्ग -1 मध्ये रुपांतरीत करण्याबाबत जमीन मालक ध्वनी परीमल शाह व इतर यांनी मा.जिल्हाधिकारी सो पालघर यांचे कडे अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने मा.जिल्हाधिकारी सो पालघर यांनी त्यांच्या कडील आदेश क्र.महसूल/कक्ष.1/टे-जमीनबाब/सीआर-51/2026 दि. 02/07/2026 अन्वये गट नं.136/31/1 क्षेत्र 0.40.00 हे. आर व गट क्र.136/39 क्षेत्र 0.40.00 हे. आर ही जमीन भोगवटादार वर्ग-2 नविन अविभाज्य शर्तीने धारण केलेली जमीन भोगवटादार वर्ग -1 मध्ये रुपांतर करण्यास अटी व शर्ती क्र 1 ते 11 यास अधिन राहून परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच सदर ची जमीन नविन शर्तीने धारण केलेली असल्यामुळे सन 2026 च्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रा नुसार येणाऱ्या किमंतीच्या 25% रूपांतरण अधिमुल्य रक्कम रुपये 7,07,900 /- (अक्षरी:- सात लाख सात हजार नऊशे रुपये मात्र) इतकी चलन क्रमांक MH 004631073 2026-27M दि.17/06/2026 अन्वये शासन जमा केली आहे. तरी सदर जमिन वरील आदेशा नुसार भोगवटादार वर्ग -1 कडे वर्ग केली असे. अट क्र. 2 नुसार सदर जमिनीचा भविष्यात बिनशेती वापर करावयाचा झाल्यास शासन विहित करील ती अकृषिक वापराकरिता अधिमुल्याची रक्कम शासन जमा करणे जमीन मालक यांचेवर बंधनकारक राहील. तसेच मा.तहसीलदार सो पालघर यांचेकडील पत्र क्र. क्रमांक/जमिनबाब-1/कावी-1420/2026 दि.30/09/2026 अन्वये नोंद केली असे.