सातबारा Watch

← पामटेंभी

Ferfar #4451 · पामटेंभी

पालघर, पालघर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
114/6, 155/7, 186/अ
Talathi
मोमीन जहीर नजीर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 मौजे पामटेंभी ता. जि. पालघर येथील गट नंबर सर्व्हे नंबर ११४/६,१५५/७,१८६अ मध्ये जिवंत सातबारा टप्पा-2 मोहिमेत महिला वारस कब्जेदार सदरी घेणेबाबत ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी अहवाल सादर केलेला आहे. ज्याअर्थी, बारस फेरफार क्रमांक-२८७५ दि. २१/०९/१९९४अन्वये इतर हक्क सदरी दाखल झालेली वारसांची नावे खालीलप्रमाणे आहेत. इतर हक्क सदरी असलेली बहिणीची किंया बहिणच्या वारसांची नावे:- १) अल्का गोपाळ संखे २) जागृती जगदीश संखे 3) प्रगती प्रसाद संखे ४) मेघना महादेव वड़े ५) रोहिणी रमेश बर्वे ज्याअथी, मा.राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे यांचेकडील सुधारीत मार्गदर्शक सूचना क्र.९० क्र. रा.भू.अ.आ.का४/रा स/१०/२०१८ दिनांक ७/१/२०१९ अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. यात शासन परिपत्रक दिनाक १९/०३/१९९८ नुसार सूचनांची अंमलबजावणी झाली नाही असे दिसून येते. तरी खालील प्रमाणे सुचना देणेत येत आहेत. केंद्र शासनाने हिंदु उत्तराधिकार अधिनियम १९५६ मध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने हिंदु उत्तराधिकार (सुधारणा) अधिनियम २००५ पारीत केला जो दिनांक ०९/०९/२००५ रोजी अमंलात आला या सुधारणेनुसार हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ च्या कलम ६ मध्ये सुधारणा करुन, सदर सुधारणेच्या दिनांकापासुन मुलींना मिळकतीत मुलांप्रमाणे समान हक्क प्राप्त झालेला आहे. उपरोक्त परिपत्रकामध्ये इतर हक्कातील वारसांची नांवे कब्जेदार सदरी दाखल करणेकामी कशा प्रकारे कार्यवाही अवलंबविण्यात यावी याकरिता मार्गदर्शक सुचना देण्यांत आलेल्या आहेत. तसेच महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०२५/प्र.क्र.१७८/ल-१ दि.३०.०४.२०२५ अन्वये इतर हक्कातील महिला वारसांची नावे कब्जेदार सदरी घेणेबाबत निर्देश देणेत आलेले आहेत. सबब, वरील फेरफारानुसार इतर हक्कात दाखल झालेली महिला वारसांची नावे कब्जेदार सदरी घेणे कामी मा.तह्सिल्दार यांचेकडील आदेश क्र/महसूल/आरटीएस-२/महिला बारस/एस आर- ३०/२०२५ दिनांक १३/१०/२०२५ अन्वये नोंद केली असे.