सातबारा Watch

← बेटेगाव

Ferfar #1631 · बेटेगाव

पालघर, पालघर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
Certified
—
Gat / Survey
158/1/प्लॉट
Talathi
एच. वी. मुळाने
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बाजुस दाखल केलेल्या गट नं. ची जमीन खालील नमुद केलेल्या इसम यांचे नावे दाखल आहे. 1) गट क्रमांक 158/1/प्लॉट नं./78 – क्षेत्र 407.00 चौ.मी. कब्जेदार – पवनकुमार फुदन साह 2) गट क्रमांक 158/1/प्लॉट नं./77 – एकुण क्षेत्र 1385.75 चौ.मी. कब्जेदार – चंदर गोपीचंद जयस्वाल व राजश्री चंदर जयस्वाल क्षेत्र- 150.75 चौ.मी. , उपेंद्रनाथ रामसनेही पाण्डेय व सुमन फणींद्रकुमार पाण्डेय क्षेत्र- 185.00 चौ.मी. , संगिता सुभाष लव्हरकर व सुभाष नथुजी लव्हरकर क्षेत्र- 200.00 चौ.मी. , दुलाजी शंकरराव कदम व शांता दुलाजी कदम क्षेत्र- 450.00 चौ.मी., निर्मला बाळासाहेब जाधव व बाळासाहेब मानसिह जाधव क्षेत्र- 200.00 चौ.मी. , मंगल विठ्ठलदास यादव व विठ्ठलदास ज्ञानोबा यादव क्षेत्र- 200.00 चौ.मी. 3) गट क्रमांक 158/1/प्लॉट नं./77/78 – क्षेत्र 1064.00 चौ.मी. कब्जेदार – वर्षा प्रकाश नाईक व इंद्रा नरेश रियावाला यांचे नावे दाखल आहे. या जमीनीबाबत मा. उपविभागीय अधिकारी पालघर , उपविभाग पालघर यांचे न्यायालयात महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये फेरचौकशी सुरु होती. या दाव्याबाबत क्रमांक पीडी/आरटीएस/फेरचौकशी/अपिल नं.48/2020 नुसार दिनांक 08/07/2025 रोजी आदेश पारित झाले आहे. 1) अर्जदार यांचा फेरतपासणी अर्ज विनाकार्यवाही कामकाजातुन वगळण्यात येत आहे. व या आदेशानुसार सहाय्यक जिल्हाधिकारी डहाणु यांचा दिनांक 07/03/2013 रोजीचा आदेश कायम ठेवावा हे आदेशामध्ये नमुद केले आहे. मा. सहाय्यक जिल्हाधिकारी डहाणु यांचा दिनांक 07/03/2013 रोजीचा आदेश कायम ठेवावा हे आदेशामध्ये नमुद केल्याने सदर आदेशाचा अंमल रेकॉर्ड दप्तरी घेणे आवश्यक आहे. या गट नं. चे जमिनीबाबत मा. सहाय्यक जिल्हाधिकारी डहाणु याचे कडील क्रमांक आरटीएस/रिव्हिजन/नं.30/2012 दिनांक 07/06/2013 यांचे न्यायालयातील आदेश खालील नमुद केल्याप्रमाणे आहे. 1) दाव्यातील भूखंड क्र.77 व 78 चा एकत्रित 7/12 उतारा रद्द करण्यात येत आहे. 2) भुखंड क्र. 77 व 78 चे 7/12 उताऱ्यामध्ये मोजणी नकाशाप्रमाणे प्लॉट नं.77 चे क्षेत्र.1280.25 व प्लॉट क्र. 78 चे क्षेत्र.427.75 चौ.मी. या क्षेत्राची नोंद घेणेत यावी. 3) प्लॉट नं.77 मधील फेरफार क्रमांक 300, 400 , 479 , 508,524,525, 526,527 व 528 या नोंदी रद्द करण्यात येत आहे. 4) प्लॉट नं.78 मधील फेरफार क्रमांक 493,494 व 690 या नोंदी रद्द करण्यात येत आहे. 5) प्रतिवादी यांचे नावे प्लॉट नं. 77 मधील क्षेत्र 539 चौ.मी. व प्लॉट नं. 78 मधील क्षेत्र 427 चौ.मी. करीता 7/12 सदरी नोंद करणेत यावी. 6) प्लॉट नं.77 मधील प्रतिवादी क्रमांक 1 व 2 यांचे क्षेत्र 539 चौ.मी. इतके वगळुन उर्वरीत क्षेत्राकरीता रद्द केलेल्या फेरफारातील प्रतिवादी यांचे खरेदीखताची नोंद 7/12 चे इतर हक्क सदरी तसेच मूळ जमीन मालक पांडुरंग माधव बर्वे अगर त्यांचे वारस यांचे नावे असलेल्या लेआऊट प्लॉट मधील 7/12 चे इतर अधिकार सदरी करणेत यावी. 7) दाव्यातील प्लॉट 78 मधील 7/12 सदरी प्रतिवादी क्र. 1 व 2 यांचे क्षेत्र 425.75 चौ.मी. करीता नोंद करून रद्द केलेल्या फेरफारातील प्रतिवादी यांचे खरेदीखताची नोंद 7/12 चे इतर हक्क सदरी तसेच मूळ जमीन मालक पांडुरंग माधव बर्वे अगर त्यांचे वारस यांचे नावे असलेल्या लेआऊट प्लॉट मधील 7/12 चे इतर अधिकार सदरी करणेत यावी. 8) मुळ मालक यांनी प्लॉट नं. 77 व 78 मधील जमिनीची विक्री दोन वेळेस केली असल्यामुळे दाव्यातील फेरफार रद्द केलेल्या प्रतिवादी यांनी जमिनीचे मालकी हक्क शाबित करणेसाठी दिवाणी न्यायालयाकडून न्याय प्राप्त करून घ्यावा. 9) प्लॉट नं. 77 व 78 चे एकत्रित 7/12 घडविणाऱ्या तत्कालीन तलाठी यांचे विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपिल ) 1982 मधील तरतुदीनुसार स्वतंत्र कारवाई प्रस्थापित करावी. वरील नमुद केल्याप्रमाणे आदेश पारित झाले आहे. या आदेशानुसार खालील नमुद केल्याप्रमाणे रेकॉर्ड दप्तरी अंमल घेण्यात आला आहे. 1) आजरोजी अस्तित्वात असलेला गट क्रमांक 158/1/प्लॉट नं./77/78 हा 7/12 रद्द करण्यात आलेला आहे. 2) गट क्रमांक 158/1/प्लॉट नं./77 – एकुण क्षेत्र 1385.75 चौ.मी.हे क्षेत्र दुरुस्त करून मोजणी नकाशा प्रमाणे आदेशामध्ये नमुद केलेले क्षेत्र 1280.25 चौ.मी. या क्षेत्राची नोंद घेण्यात आली आहे व या दुरुस्त क्षेत्रावर प्रतिवादी क्रमांक 1 व 2 यांचे नावे क्षेत्र 539 चौ.मी. या क्षेत्राची नोंद घेतली आहे व 7/12 वरील कब्जेदार यांचे फेरफार रद्द झाल्याने त्यांचे नावाची नोंद कब्जेदार सदरी कमी करून 7/12 चे इतर अधिकार सदरी घेण्यात आले आहे. 3) गट क्रमांक 158/1/प्लॉट नं./78 – एकुण क्षेत्र क्षेत्र 407.00 चौ.मी..हे क्षेत्र दुरुस्त करून मोजणी नकाशा प्रमाणे आदेशामध्ये नमुद केलेले क्षेत्र 427.75 चौ.मी. या क्षेत्राची नोंद घेण्यात आली आहे व या दुरुस्त क्षेत्रावर प्रतिवादी क्रमांक 1 व 2 यांचे नावे क्षेत्र 425.75 चौ.मी. या क्षेत्राची नोंद घेतली आहे व 7/12 वरील कब्जेदार यांचे फेरफार रद्द झाल्याने त्यांचे नावाची नोंद कब्जेदार सदरी कमी करून 7/12 चे इतर अधिकार सदरी घेण्यात आले आहे. 158/1/प्लॉट नं. 77/78