सातबारा Watch

← चांदीप

Ferfar #1593 · चांदीप

वसई, पालघर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
नितीन रामा सुर्वे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नं. 90/1/प्लॉट नं. 30 क्षेत्र 1.62.0 हे.आर. जमीन चंद्रकांत लाडक्या टबाळे व तुकाराम लाडक्या टबाळे यांचे नावे चालत असून सदर जमिनीबाबत काशिनाथ लाडक्या टबाले व इतर 4 यांनी फेरफार क्र. 637 च्या निर्णयाने व्यथीत होवून फेरफार क्र. 637 च्या निर्णयाविरूध्द महाराष्ट्र जमिन महसूल महसूल अधिनियम 1966 चे कलम 47 अन्वये मा. उपविभागीय अधिकारी वसई यांचे न्यायालयात क्र.व्हीडी/आरटीएस/अपिल/नं.07/2026 प्रमाणे अपिल दाखल केले होते. सदर अपिलाच्या अनुषंगाने मा. न्यायालयात सुनावणी घेवून सदर प्रकारणी दिनांक 20/07/2026 रोजी न्यायनिर्णयासाठी सदर प्रकरण बंद करण्यात आले असून फेरफार क्र. 371 नुसार सर्व्हे क्रमांक 31/अ, 90/1, 52/0, पैकी 90/1/प्लॉट नं. 30 या जमीनींना अर्जदार/अपीलार्थी यांचे पुर्वगामी हक्कदार लडक्या नाऊ टबाले यांना दिनांक 04/06/1971 मध्ये शासनाच्या महसुल व वनविभागाकडील दिनांक 09/03/1970 चा ठराव क्र. 2769, 37076अ लगत नों.हु.न. LND/FOR/26/6/70 अन्वये जमीन वाटपात देण्यात आली असून फेरफार क्र. 637 प्रमाणे खातेदार लडक्या सुकऱ्या टबाले हे मयत असून त्यांना वारस 1) चंद्रकांत लडक्या टबाले 2) तुकाराम लडक्या टबाले असून सदर फेरफार नोंद सर्व्हे नं. 90/1/प्लॉट नं. 8 व प्लॉट नं. 30 करीता दाखल करण्यात आली होती. परंतू प्लॉट नं. 30 हा लडक्या सुकऱ्या टबाले यांना मंजूर झालेला नसून तो लडक्या नाऊ टबाले यांचे नावे मंजूर झालेला आहे. तरी सदरची वस्तुस्थिती पाहता मा. उपविभागीय अधिकारी सो. वसई यांनी खालीलप्रमाणे आदेश पारीत केले आहेत. 1) अपिलार्थ यांचे अपिल मान्य करण्यात येत आहे. 2) गाव मौजे चांदीप येथील फेरफार क्र. 637 हा स.नं. 90/1/प्लॉट नं. 30 पुरता रद्द करण्यात येत आहे. 3) तलाठी सजा शिरसाड व मंडळ अधिकारी मांडवी यांनी मयत लडक्या नाऊ टबाले यांचे सर्व कायदेशीर वारसांची चौकशी करावी. व आवश्यकता असल्यास संबंधितांकडून वारस प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊन योग्य वारसांची नोंद 7/12 सदरी घेण्यात यावी. करीता मा. उपविभागीय यांचेकडील आदेशाप्रमाणे सर्व्हे नं. 90/1/प्लॉट नं. 30 पुरता फेरफार क्र. 637 रद्द करून मुळ जमीन मालक लडक्या नाऊ टबाले यांचे नाव 7/12 सदरी दाखल करून 7/12 पुर्ववत केला असे. 90/1/प्लॉट नं/30