सातबारा Watch

← बिलालपाडा

Ferfar #2548 · बिलालपाडा

वसई, पालघर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
सुशांत प्रताप खराडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 आदेशाने बाजुस दाखल केलेल्या स.नं. व हि.नं. 52 , क्षेत्र 10.36.00 हे. आर ही जमीन 7/12 सदरी डायरेक्टर ऑफ इंन्डस्ट्रीज महाराष्ट्र राज्य यांच्या नावे दाखल आहे. सदर जमिनीमधील प्लॉट नं. 40/1 ही मे. बार इंडस्ट्रीज चे मालक श्री. पॉल बँरीटो यांना वसई तालुका इंडस्ट्रीयल को. ऑप इस्टेट यांनी पोट भाड्याने दिलेली आहे. सदर जमिनीमध्ये व सदर जमिनीच्या पलीकडील जागेत 903 ब्रास माती उत्खनन केल्याने मा. तहसिलदार वसई यांचेकडील आदेश क्र. मशा/कक्ष-1/टे-गौण खनिज/अउभ/एसआर-14/22, दि. 01/07/2022 रोजीचे आदेश होऊन दंडनिय रक्कम शासन जमा करावे असा आदेश झाल्याने मे. बार इंडस्ट्रीज चे मालक श्री. पॉल बँरीटो यांनी सदर आदेशाच्या विरुध्द मा. उपविभागीय अधिकारी वसई यांचे न्यायालयात अपील दाखल केले होते, सदर अपीलाचा निकाल होऊन मा. उपविभागीय अधिकारी वसई यांचेकडील आदेश क्र. व्हीडी/गौणखनिज/संकिर्ण/नं.167/2025, दि. 31/01/2025 अन्वये अपिलार्थी यांचा अर्ज नामंजुर करुन मा. तहसिलदार वसई यांनी यापुर्वी दिलेले आदेश कायम ठेवण्यात आल्याने तसेच अपिलार्थी यांनी वरीष्ठ न्यायालयात अपील दाखल केले बाबतचे कागदपत्रे आजरोजी पर्यंत या कार्यालयाकडे हजर न केल्याने, वरील आदेशानुसार स.नं. 52 या जमिनीच्या इतर हक्क सदरी र.रु. 50,97,435/- ( पन्नास लाख सत्यानऊ हजार चारशे पस्तीस रुपये ) रक्कमेचा मे. बार इंडस्ट्रीज चे मालक श्री. पॉल बँरीटो यांच्या नावे गौणखनिजाचा बोजा दाखल केला असे.