सातबारा Watch

← तिल्हेर

Ferfar #1398 · तिल्हेर

वसई, पालघर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
94/1
Talathi
रुपाली यशवंत कोळी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 बाजूस दाखल केलेल्या स.नं./हि.नं. च्या मिळकत श्री.गणपत जीवन भावर व इतर यांच्या नावे दाखल असुन सदर जमीन मिळकत कुळ कायदा कलम ४३ ला पात्र असल्याने अर्जदार श्री.गणपत जीवन भावर यांनी सदर जमिनी ची कुळ कायदा कलम ४३ ला ची शर्त शिथिल करुन मिळणेसाठी शासन परि पत्रकानुसार अर्ज दाखल केला आहे. शासन परिपत्रक क्रमांक जमीन- २०२५/ प्र.क्र.३३६/ जमीन-०१ (ई-१३७९२३४) दिनांक १६ जुलै २०२६ मधील तरतूद, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेजमिन अधिनियम, १९४८ च्या कलम ४३ च्या पोटकलम (१) मधील दुस-या परंतुकाखालील खंड (क) हैदराबाद कुळवहिवाट अधिनियम, १९५० चे कलम ५०व मधील पोटकलम (१) मधील परंतुकाखालील खंड (क) तसेच, महाराष्ट्र कुळवहिवाट (विदर्भ प्रदेश) अधिनियम, १९५८ चे कलम ५७ मधील पोटकलम (१) मधील परंतुकाखालील खंड (क) महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन कायदे (सुधारणा) अधिनियम, २०२६ नुसार वगळण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता यापुढे विहित १० वर्षाचा कालावधी संपल्यावर सदर तरतुदींनुसार कार्यवाही करताना महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा आकारण्यात येऊ नये. त्यानुसार सर्व संबंधित क्षेत्रामधील कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियमातील तरतुदीन्वये प्राप्त जमिनींबाबत तात्काळ विशेष मोहिम राबवून सदर तरतुदींचे काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देशीत केलेले आहे. प्रकरणी अभिलेख तपासता असता, मौजे तिल्हेर, ता. वसई येथील स.नं. ९४/१ या जमिनीबाबत कुळ कायदा कलम ३२ म अन्वये ठरलेला जमिन विक्रीचा बोजा भरल्याने टेनन्सी सर्टिफिकेट बावत इतर हक्कात दाखल असलेली बोजाची नोंद कमी केली असून तशी गावी मंजुर फे.क्र. ५९२ दि. १७/१०/१९८५ कडे नोंद दाखल आहे. सदर जमिनीची कुळ कायदा कलम ४३ ला पात्र नि.स.प्र. हि नोंद कमी करुन सदर जमिनीचा भोगवटदार वर्ग २ कमी करुन भोगवटदार वर्ग १ केला असे. जमिनीचे वर्णन स.नं./हि.नं. ला.यो. क्षेत्र(हे.आर.) पो.ख.(हे.आर.) आकार(रु.) 94/1 0.78.00 0.47.00 0.31 नोंद :- मा.महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक जमीन- २०२५/ प्र.क्र.३३६/ जमीन-०१ (ई-१३७९२३४) दिनांक १६ जुलै २०२६ मधील तरतूद, मा.तहसीलदार वसई यांचेकडील आदेश क्र.महसूल/क १/टे हक्कनोंद/ कलम ४३ /एसआर-14/२०२६ दिनांक 21/09/2026 अन्वये नोंद केली