Ferfar #1713 · बापाणे
वसई, पालघर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/2
- Talathi
- मयुरी ल गवळी
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मौजे बापाणे , ता.वसई, जि.पालघर येथील स.नं./ग.नं ४/२, एकूण क्षेत्र ०.८२.५० हे.आर., आकार रु.१.०२ ही जमीन भोगवटादार वर्ग -२ (नवीन अविभाज्य शर्तीची) या धारणा प्रकारात श्री. वसंत आब्या पाटील, रा.बापाणे, ता.वसई ,जि.पालघर यांचे नावे असून सदर धारकांनी सदर जमीन भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करून मिळणेबाबत केलेल्या दि.०७/०२/२०२३ रोजीच्या विनंती अर्जानुसार, तहसीलदार वसई यांचेकडील शिफारस पत्र, उपसंचालक नगररचना विभाग (वसई-विरार शहर महानगरपालिका) यांचेकडील ना-हरकत अहवाल, उप वनसंरक्षक डहाणू यांचेकडील अहवाल, तसेच महाराष्ट्र शासनाचे महसूल व वन विभागाकडील अधिसूचना क्र.महसूल/कक्ष-१/टे.जमिनबाब कावि/१८२७/३८१९/नों.व.क्र.-९१/२०२३ दि.१२/०४/२०२३ , अधिसूचना क्र.जमीन-२०१८/प्र.क्र.९०/ज-१ दि.०८/मार्च/२०१९ आणि शासन ज्ञापन क्र.जमीन-२०२४/प्र.क्र.३१//ज-१ दि.०६ सप्टेंबर २०२४ यांतील तरतुदींस अनुसरून, मा. जिल्हाधिकारी पालघर यांनी आदेश क्र.महसूल/कक्ष-१/टे-टेनन्सी/भोगवटादार रुपांतरण/एसआर-०१/२०२५, दि.०६/०१/२०२५ अन्वये सदर संपूर्ण क्षेत्र ०.८२.५० हे.आर. भोगवटादार वर्ग-२ मधून भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करण्यास खालील ७ अटी व शर्तींच्या अधीन राहून मंजुरी दिली आहे.
अटी व शर्ती
१. सदर जमीन भोगवटादार वर्ग-२ मधून भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत होत असली तरी, वेळोवेळी पारीत होणारे शासन निर्णय अर्जदार यांचेवर बंधनकारक राहतील.
२. भविष्यात शर्तभंग निदर्शनास आल्यास प्रचलित नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.
३. सदर ठिकाणी भविष्यात करावयाच्या बांधकामास नियोजन/सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.
४. सदर उप संचालक,नगर रचना विभाग,वसई विरार शहर महानगरपालिका यांचेकडील पत्र जा.क्र.वविशम/नर/झो.दा./१७६६/४१८०/२०२३-२४ दि.०५/०२/२०२४ रोजीच्या पत्रातील अटीव शर्ती अर्जदार यांचेवर बंधनकारक राहतील.
५. सदर जमिनीबाबत न्यायालयीन वाद निर्माण झाल्यास ही परवानगी त्या निर्णयास अधीन राहील.
६. अर्जदारांनी दिलेली कागदपत्रे व परिस्थिती खरी समजून परवानगी दिली असून, भंग आढळल्यास अर्जदार सर्वस्वी जबाबदार राहतील.
७. वरील सर्व अटी व शर्ती जमीन मालकांवर बंधनकारक राहतील अशी नोंद ७/१२ इतर हक्कात कायम ठेवावी.
सदर रुपांतरणापोटी प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रकातील दराच्या ५०% इतकी अधिमूल्याची रक्कम रु. २१,८६,२५०/- अक्षरी रुपये एकवीस लाख शहाऐंशी हजार दोनशे मात्र) अर्जदार यांनी चलन क्रमांक MH0110090742024M, दि.12/11/2024 अन्वये शासनास जमा केली असून, त्याप्रमाणे जिल्हाधिकारी पालघर यांनी उक्त आदेशान्वये रुपांतरणास
परवानगी दिली आहे.
त्यानुषंगाने सदर आदेशातील अटी व शर्तींसह भोगवटादार वर्ग-२ (नवीन व अविभाज्य शर्तीची जमीन) चे भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरण करणे कामी सदरची नोंद केली असे.तसेच मा. जिल्हाधिकारी पालघर यांचा कडील आदेश क्र.महसूल/कक्ष-१/टे.टेनन्सी/भोगवटा रुपांतरण/एसआर-०१/२०२५ मधील सर्व अटी व शर्ती जमीन मालकांवर बंधनकारक राहतील अशी नोंद ७/१२ इतर हक्कात केली असे.
नोंद – मा. जिल्हाधिकारी पालघर यांनी आदेश क्र.महसूल/कक्ष-१/टे.टेनन्सी/भोगवटा रुपांतरण/एसआर-०१/२०२५ अन्वये नोंद.