सातबारा Watch

← डोंगरे

Ferfar #2173 · डोंगरे

वसई, पालघर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
119/11, 122/8, 132/3
Talathi
ऋषिकेश र चौधरी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 आदेशान्वये बाजुस दाखल केलेली 1) स.न 111 हि.नं.11 क्षेत्र 0.0480 हे आर.चौ.मी, 2) स.न 122 हि.नं.8 क्षेत्र 0.0150 हे आर.चौ.मी 3) स.न 132 हि.नं.3 क्षेत्र 0.0910 हे आर.चौ.मी ची जमीन कु.का.क. 43 ला पात्र आहे.सदर जमीनीस जमीन मालक श्री.हितेंद्र माणिक मांगेला व इतर यांनी ज्याअर्थी जमीन मालक यांनी सदर जमिनीचे आकाराच्या 40 पट नजराणा रक्कम रु. 350/- (अक्षरी र.रु. तीनशे पन्नास मात्र ) MH013183888 चलनाव्दारे दि. 02/11/2026 रोजी शासन जमा केली आहे.मा.उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वसई (कुळवहिवाट शाखा)अर्ज केला असून महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे तरतुदीनुसार प्राप्त झालेली आहे व ज्याअर्थी सदरहू मिळकत महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम 43 ला पात्र आहे.जमीन मालक ते स्वतः जमीन कसणेसाठी आर्थिकदृष्ट्या असमर्थ असल्याने महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ ची शर्त शिथिल करून मिळणेसाठी खालील नमूद अटी व शर्तीस अधीन राहून कृषी प्रयोजानासाठी शर्त शिथिल करून हस्तांतरण करण्यास परवानगी देण्यात येत आहे.अन्वये 7/12 चे कागदोपत्री दाखल असलेली नियंत्रीत सत्ता प्रकार कु.का.क. 43 ला पात्र नोंद कमी केली असे. अटी व शर्ती १.सदरची परवानगी हि वेळोवेळी राज्य शासनाचे/केंद्र शासनाचे प्रचलित कायदे व नियम यांना आधिन राहून देण्यात येत आहे.जमीन मालक हे कोणत्याही प्रचलित कायद्यातील सुधारणे नुसार अनार्जित रक्कम/दंड/बाकी शासनास पुर्व लक्षी प्रभावाने अदा करणेस पात्र राहतील. २. प्रस्तुत जमीन मालक यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्राचे मजकुरास आधिन राहून सदर परवानगी देणेत आली असून प्रतिज्ञापत्रमधील मजकुराचे सत्यतेबाबत भविष्यात कोणताही प्रश्न उदभवल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी जमीन मालक यांची राहील. ३. सदर परवानगी प्रमाणे हस्तांतर /शर्त शिथिल करत असताना महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ चे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. ४.या आदेशाच्या दिनांक पासून एक वर्षाच्या आत महाराष्ट्र जमीन मह्सूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ नुसार बिनशेती परवानगी प्राप्त करून घेणे बंधनकारक राहील. तसे न झाल्यास सदरची परवानगी आपोआप रद्द समजण्यात येईल. ५. सदर आदेशानंतर जर नमूद मिळकतीचे हस्तांतरण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६ ६,मुंबई तुकडेजोड तुकडेबंदी कायदा १९४७, महाराष्ट्र शेतजमीन(जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम १९६१ सुधारित कायदा १९७५ इत्यादी अधिनियम यांचे तरतुदींचे पालन करून फेरफार करणेबाबत नियमानुसार योग्य ती कार्यवाही करणेची जबाबदारी मंडळ अधिकारी यांची राहील. ६. सदर आदेश/निर्गमित करणे पूर्वी कोणत्याही खातेदार मयत झालाचे आढळल्यास सदर आदेश आपोआप रद्द होईल. ७. सदर आदेश संचिकेत समाविष्ट असलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निर्दशनास आल्यास सदरचे आदेश आपोआप रद्द होईल. ८. प्रस्तुत जमीन मिळकती बाबत कोणत्याही न्यायलयात वाद सुरु असल्यास सदरची परवानगी आपोआप रद्द समजण्यात येईल. ९. सदर जमीन मिळकतीच्या क्षेत्राबाबत भविष्यात काही वाद उपस्थित झाल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी जमीन मालक यांची राहील. १०. सदर जमीन मिळकतीच्या कुळ नोंद/३२ ग आदेशा बाबत भविष्यात काही वाद उपस्थित झाल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी जमीन मालक याची राहील. ११.परवानगी धारक यांना सदरहू जमिनीची विक्री करणेची झाल्यास जमीन खरेदीदार यांचे धारण क्षेत्र महाराष्ट्र शेतजमीन धारणेची कमालमर्यादा कायदा १९६१ चे कलम ३ व४ मधील तरतुदी नुसार अतिरिक्त होऊ नये म्हणून जमीन खरेदीदार यांनी या कार्यलयात स्वतः धारण क्षेत्राचा तपशील दर्शविनारा ८अ उतारा तसेच खातेदारांचे धारण क्षेत्र महाराष्ट्र शेतजमीन धारणेची कमाल मर्यादा कायदा १९६१ नुसार विहित मर्यादेपेक्षा धारण केलेले क्षेत्र अधिक होत नाही अशा आशयाचे बंधपत्र सादर करावे. व खरेदी विक्री व्यवहार नोंदविणे पूर्वी या कार्यालयाकडून तसा आशयाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. (नोंद- मा.उपविभागीय अधिकारी ह्यांच्याकडील आदेश क्र.महसूल/व्हिडी/कक्ष-१/टे-1/टेनन्सी /एसआर 27/2026 दिनांक 02/11/2026 अन्वये नोंद केली असे.)