Ferfar #11298 · उत्तन
ठाणे, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
बाजुस दाखल केलेल्या स.नं. च्या जमिनीस गावी फेरफार क्र 4371 व 4370 अन्वये “मा.उच्च न्यायालय मुंबई रिट याचीका 1868/1998 व 1869/1998 दिनांक 20/04/1998 च्या आदेशानुसार मुंबई उच्च न्यायालय यांचा याचिका 1868 व 1869 दिनांक 20/04/98 चे आदेशाप्रमाणे अंतिम निर्णय होईपर्यंत स्थगिती आदेश” अशी नोंद दाखल आहे. परंतु सदरची नोंद कमी करणेबाबत मा. अपर तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी, मिरा भाईंदर यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.महसुल/टे-1/हक्कनोंद/आ.क्र.5626/कावि-1388/2026, दिनांक 28/10/2026 रोजीच्या पत्रान्वये कळविल्याने 7/12 च्या इतर हक्क सदरी दाखल असलेली “मा.उच्च न्यायालय मुंबई रिट याचीका 1868/1998 व 1869/1998 दिनांक 20/04/1998 च्या आदेशानुसार मुंबई उच्च न्यायालय यांचा याचिका 1868 व 1869 दिनांक 20/04/98 चे आदेशाप्रमाणे अंतिम निर्णय होईपर्यंत स्थगिती आदेश” ही नोंद कमी केली असे.
जमिनीचे वर्णन :-
सर्वे क्र.120/9, क्षेत्र 3500.00 चौ.मी.
सर्वे क्र.361, क्षेत्र 13600.00 चौ.मी.
(नोंद - मा.उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील अॅप्लिकेशन क्र.16920/2022 व 17090/2022,दिनांक 01/10/2026, व मा. अपर तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी, मिरा भाईंदर यांचेकडील क्र.जा.क्र.महसुल/टे-1/हक्कनोंद/आ.क्र.5626/कावि-1388/2026, दिनांक 28/10/2026,वरुन)