Ferfar #4949 · पांचपाखाडी
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 432/2
- Talathi
- JEEVAN NIVRATI KORE
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026बाजुस दाखल स. नं. ची जमिन कब्जेदार सदरी राजीवकुमार दामोदर भडाणी, शैलादेवी दामोदर भडाणी, सतिशकुमार दामोदर भडाणी, सुधीरकुमार दामोदर भडाणी, सुनिलकुमार दामोदर भडाणी यांचे नावे दाखल असुन ७/१२ सदरी इतर हक्कात नागरी जमीन (कमाल धारणा व विनियमन) अधिनियम १९६६ चे कलम २०-२१ अन्वये दुर्बल घटक गृहबांधणी योजनेखालील क्षेत्र हस्तांतरणास बंदी अशी नोंद दाखल आहे. सदर जमिनीपैकी स.नं. ४३२/२ क्षेत्र 8.3117 आर.चौ.मी. जमिन महामाया को.ऑप.हौसिंग सोसायटी लि. यांनी जमिन मालक राजीवकुमार दामोदर भडाणी, शैलादेवी दामोदर भडाणी, सतिशकुमार दामोदर भडाणी, सुधीरकुमार दामोदर भडाणी, सुनिलकुमार दामोदर भडाणी यांचे तर्फे मान्यता देणार युनिट अरसेन्स डेव्हलपर्स, स्वीट मदर एन्टरप्राईजेस यांचे तर्फे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था ठाणे यांच्यावतीने श्री. किशोर मांडे यांचेपासुन सह दुय्यम निबंधक ठाणे 1 यांचेकडील कन्व्हेन्स डीड पत्र क्रमांक 418/2026 व दिनांक – 13/01/2026 प्रमाणे खरेदी रक्कम 0/- यांस खरेदीने घेतली आहे. तसेच मा.जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी, ठाणे नागरी संकुलन, ठाणे यांचेकडील पत्र जा.क्र.युएलसी/टिए/एटिपी/कलम-21/एस.आर./28/184/26 दिनांक-11/05/2026 नुसार महामाया को.ऑप.हौसिंग सोसायटी लि. यांना मौजे - पाचपाखाडी ता.जि.ठाणे येथील स.नं. 432/2 क्षेत्र 8.3117 आर चौ.मी. या जमिनीस आज रोजी नाजकधाचे तरतुदी लागु नसल्याने महामाया को.ऑप.हौसिंग सोसायटी लि. चे नाव अधिकार अभिलेखात दाखल करणेस हरकत नाही अशी ना हरकत दिलेली आहे. सह दुय्यम निबंधक ठाणे 1 यांचेकडील कन्व्हेन्स डीड पत्र क्रमांक 418/2026 व दिनांक – 13/01/2026 नुसार स.नं. ४३२/२ यापैकी 8.3117 आर.चौ.मी. जमिन खरेदीने महामाया को-ऑप.हौसिंग सोसायटी लि. यांचे नावे दाखल करून अधिकार अभिलेख अद्यावत करणेची नोंद केली असे.
( नोंद – वर्दी अर्ज, सह दुय्यम निबंधक ठाणे 1 यांचेकडील कन्व्हेन्स डीड पत्र क्रमांक 418/2026 व दिनांक – 13/01/2026 व मा.जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी, ठाणे नागरी संकुलन, ठाणे यांचेकडील पत्र जा.क्र.युएलसी/टिए/एटिपी/कलम-21/एस.आर./28/184/26 दिनांक 11/05/2026 यावरून नोंद केली असे.)