Ferfar #2639 · वडवली
ठाणे, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
आदेशाने- महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक क्र. जमीन-२०२५/प्र.क्र.३३६/जमीन-०१(ई-१३७९२३४) दि. १६/०७/२०२६ अन्वये, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम, १९४८ कायद्यातील अनुक्रमे कलम ५७, कलम ५०-ब, कलम ४३ नुसार जमीन कसणाऱ्या कुळास कुळकायद्यानुसार मालकी हक्क दिल्यापासून १० वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर जमिनीची विक्री करता येते. तदअनुषंगाने महसुल आकारणीच्या ४० पट नजराणा आकारणीची तरतुद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम २०२६ (दि.१५/०४/२०२६चेराजपत्र) नुसार रद्द करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने खालील स.नं च्या जमिनीबाबत महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम,१९४८ च्या कलम४३ अन्वये ३२म प्रमाणपत्र निर्गमित झाल्यापासुन १० वर्ष पूर्ण झालेली आहेत. सदर शासन परिपत्रक वमा. तहसीलदार ठाणे यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कावी/०७/२०२६दि.२७/०७/२०२६ अन्वये बाजूस दाखल केलेल्या स.नं च्या मिळकतीबाबत 7/12 सदरी दाखल असलेली महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ ची अट शिथिल करण्यात आलेली आहे. करिता प्रस्तुत स.नं च्या जमिनीवरील भोगवटदार वर्ग २ हि भूधारणा पद्धती कमी करून भोगवटदार वर्ग १ अशी भूधारणा दाखल केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी केली असे.
नोंद:- महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक क्र.जमीन-२०२५/प्र.क्र.३३६/जमीन-०१(ई-१३७९२३४) दि.१६/०७/२०२६ व मा. तहसीलदार ठाणे यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/ कावी/ ०७/२०२६ दि.२७/०७/२०२६ वरून.