सातबारा Watch

← म्हातार्डी

Ferfar #909 · म्हातार्डी

ठाणे, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
62/1/ब
Talathi
रत्नदीप बाबुराव कांबळे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 आदेशाने - महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग यांचेकडील परिपत्रक क्र.जमीन-2025/प्र.क्र.336/जमीन-01(ई-1379234) दि.16/07/2026 अन्वये, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम, 1948 कायद्यातील अनुक्रमे कलम 57, कलम 50-ब, कलम 43 नुसार जमीन कसणाऱ्या कुळास कुळकायद्यानुसार मालकी हक्क दिल्यापासून 10 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर जमिनीची विक्री करता येते. तदअनुषंगाने महसुल आकारणीच्या 40 पट नजराणा आकारणीची तरतुद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम 2026 (दि.15/04/2026 चे राजपत्र) नुसार रद्द करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने खालील स.नं च्या जमिनीबाबत महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, 1948 च्या कलम 43 अन्वये 32(म) प्रमाणपत्र निर्गमित झाल्यापासुन 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. सदर शासन परिपत्रक व मा. तहसीलदार ठाणे यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कावी/07/2026 दि.27/07/2026 अन्वये खालील स.नं च्या मिळकतीबाबत 7/12 सदरी दाखल असलेली महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 ची अट शिथिल करण्यात आलेली आहे. करिता प्रस्तुत स.नं च्या जमिनीवरील भोगवटदार वर्ग 2 हि भूधारणा पद्धती कमी करून भोगवटदार वर्ग 1 अशी भूधारणा दाखल केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. जमिनीचे वर्णन :- क्षेत्रफळ स.नं.62/1/ब एकूण क्षेत्र 0.56.40 हे.आर.चौ.मी. (नोंद:- महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग यांचेकडील परिपत्रक क्र.जमीन-2025/प्र.क्र.336/जमीन-01 (ई)-1379234 दि.16/07/2026 व मा. तहसीलदार ठाणे यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कावी/07/2026 दि.27/07/2026 वरून)