Ferfar #4446 · शिळ
ठाणे, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
मा. तहसीलदार ठाणे यांचेकडील पत्रावरून मौजे शिळ ता.जि.ठाणे येथील स.नं.१७३/३ व १७३/४ या जमीन मिळकतीचे भोगवटदार सदरी दावते हादिया जमाते सुलेमानी ट्रस्ट तर्फे मॅनेजर नाझीर गुलाम हुसेन हुसामी यांचे नाव दाखल आहे. प्रकरणी भोगवटदार सदरी दाखल असलेले दावत ए हादिया जमात ए सुलेमानी ट्रस्ट तर्फे मॅनेजर नाझीर गुलाम हुसेन हुसामी हे मयत झाले असल्याने त्यांचे नाव कमी करून नवीन ट्रस्टी म्हणुन १) सादुल्लाह हुसामी २) फरहाद अली सय्यद ३) जाफर सादुल्लाह रशीद यांचे नाव दाखल करणेकामी विनंती अर्ज केलेला आहे. त्या अनुषंगाने अर्जदार यांनी दि बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अॅक्ट १९५० नुसार वक्फ बोर्ड गुजरात राज्य यांचेकडील अनु क्र.५६२, १९-८-६० दि.१७/०९/२०२५ नुसार दिलेला दाखला सादर केलेला असुन सदर दाखल्यामध्ये दावत ए हादिया जमात ए सुलेमानी ट्रस्ट तर्फे ट्रस्टी/मॅनेजर नाझीर गुलाम हुसेन हुसामी व हाजरत मोहम्मद इब्राहीम मोहम्मद झाई हे मयत झाल्याने त्यांचे जागी नवीन ट्रस्टी म्हणुन १) सादुल्लाह सय्यद नसरुल्लाह हुसामी २) फरहाद अली सय्यद नसरुल्लाह ३) जाफर सादुल्लाह रशीद यांची नवीन ट्रस्टी म्हणुन नियुक्ती केल्याचे दिसून येत आहे. तसेच वक्फ बोर्ड गुजरात राज्य यांनी त्यांचेकडील पत्र क्र.GSWB/OUT/B-562, VADODARA/8573/2026 DT.03/08/2026 रोजीच्या पत्रानुसार दावत ए हादिया जमात ए सुलेमानी ट्रस्ट ट्रस्टी/मॅनेजर गुलाम हुसेन सय्यद नसरुल्ला हुसामी यांचे नाव सदर ट्रस्ट मधून कमी करून १) फरहाद अली सय्यद नसरुल्लाह २) जाफर सादुल्लाह रशीद यांचे नाव समाविष्ट केलेले आहे.
तरी प्रस्तुत प्रकरणी वक्फ बोर्ड गुजरात राज्य यांचेकडे दि.१७/०९/२०२५ रोजीच्या दाखल्या नुसार व दि.०३/०८/२०२६ रोजीच्या पत्रानुसार सदर मिळकतीचे भोगवटदार सदरी दाखल असलेले दावत ए हादिया जमात ए सुलेमानी ट्रस्ट तर्फे मॅनेजर नाझीर गुलाम हुसेन हुसामी यांचे नाव कमी करून त्याऐवजी ट्रस्टी म्हणुन १) सादुल्लाह सय्यद नसरुल्लाह हुसामी २) फरहाद अली सय्यद नसरुल्लाह ३) जाफर सादुल्लाह रशीद यांचे नावाची नोंद करणेकामी मा. तहसीलदार ठाणे यांचेकडील पत्र क्र.महसुल/कक्ष-१/हक्कनोंद-१/टे-३/कावी-९२९३/२०२६ दि.०६/१०/२०२६ प्राप्त झालेवरून गावदप्तरी तशी नोंद केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद:- मा. तहसीलदार ठाणे यांचेकडील पत्र क्र.महसुल/कक्ष-१/हक्कनोंद-१/टे-३/कावी-९२९३/२०२६ दि.०६/१०/२०२६, दि बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अॅक्ट १९५० नुसार वक्फ बोर्ड गुजरात राज्य यांचेकडील अनु क्र.५६२, १९-८-६० दि.१७/०९/२०२५ नुसार दिलेला दाखला, वक्फ बोर्ड गुजरात राज्य यांचेकडील पत्र क्र.GSWB/OUT/B-562, VADODARA/8573/2026 DT.03/08/2026, दावत ए हादिया जमात ए सुलेमानी ट्रस्ट यांचेकडील दि.१८/०९/२०२५ रोजीचा अर्ज व सत्यप्रतिज्ञा लेखा वरून)