सातबारा Watch

← चिंबीपाडा

Ferfar #667 · चिंबीपाडा

भिवंडी, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
90/11, 90/12
Talathi
किसन परसु हंबीर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र.बीडी/खाजगी वने (चिंबीपाडा) किरकोळ अपील क्र.08/2025 आदेश दिनांक : 28/10/2026 मा.तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण भिवंडी यांचे कडील क्र.कु.का.क.70 ब/फे.चौ./चिंबीपाडा/एसआर- 05001/2024 दिनांक 03/03/2025 रोजी मौजे चिंबीपाडा,ता.भिवंडी,जि.ठाणे येथील अपिलांकित जमीन स.नं.90/11 क्षेत्र 0-34-00,पो.ख.0-01-30,आकार 0.37 रु.पै.,स.नं.90/12 क्षेत्र 0-25-00, आकार 0.29 रु.पै.बाबत खालील प्रमाणे आदेश दिले होते. 1.मा.उपविभागीय अधिकारी,भिवडी विभाग, भिवंडी यांचे टेनन्सी अपिल क्र.बीडी/टेनन्सी/अपिल नं.139/2023 चे कामी दिनांक 02/05/2024 रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने केलेल्या चौकशीअंती मौजे चिंबीपाडा, ता.भिवंडी, जि.ठाणे येथील स.नं. 90/11 व 90/12 या जमिनीस अर्जदार हे कुळ म्हणून घोषित करणेंत येत आहे. 2. महाराष्ट्र खाजगी वने (संपादन) कायदा, 1975 चे कलम 22 अ अन्वये चौकशी झालेनंतर अर्जदार यांचे नाव कुळ म्हणून दावा शेतजमिनीस नोंद घेणेंत यावी. 3. ग्राम महसूल अधिकारी, चिंबीपाडा यांनी आदेशा प्रमाणे गाव दप्तरी अंमल द्यावा. 4. सदरचा निर्णय संबंधितांना कळविण्यात यावा. 5. खर्चाबाबत आदेश नाही. 6. सदरचा निर्णय www.eqjcourts.gov.in.या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत यावा. सदर आदेशातील मुद्दा क्र. 2 नुसार अपिलार्थी सुनिल काळुराम मुंढे यांनी मा.उपविभागीय अधिकारी सो.भिवंडी यांचे न्यायालयात अपील दाखल केले होते. सदर अपिला बाबत क्र.बीडी/खाजगी वने (चिंबीपाडा) किरकोळ अपील क्र.08/2025 दिनांक 28/10/2026 रोजी आदेश होऊन मा.उपविभागीय अधिकारी सो.भिवंडी यांनी खालील प्रमाणे आदेश दिले आहेत. 1) निकालपत्रात नमूद कारणास्तव अपिलार्थी यांचा अपिल अर्ज अंशतः मान्य करण्यात येत आहे. 2) तहसीलदार व शेतजमिन न्यायाधिकरण भिवंडी यांचेकडील क्र.कु.का.क.70ब/फे.चौ./चिंबीपाडा/एसआर-05001/2024 दि.03/03/2025 रोजीच्या आदेशामधील क्र.1 प्रमाणे अपिलार्थी यांचे नावाची कुळनोंद वाद मिळकतीच्या 7/12 उता-यावर इतर हक्क सदरी दाखल करण्यात यावी. 3. बाधित पक्षकार यांना महाराष्ट्र खाजगी वने(संपादन)कायदा,1975 मधील तरतुदीचे अवलोकन करुन स्वतंत्र अर्ज करणेची मुभा देण्यात येत आहे. 4. खर्चाबाबत आदेश नाही. 5. सदरचा निर्णय संबंधित पक्षकारांना कळविण्यात यावा. 6. सदरचा निर्णय शासनाचे www.eqjcourts.gov.in.या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. वरील प्रमाणे आदेश झाल्याने अपिलार्थी सुनिल काळुराम मुंढे यांचे नावाची कुळ नोंद 7/12 च्या इतर हक्क सदरी केली असे. जमिनीचा तपशील – मौजे-चिंबीपाडा,ता.भिवंडी,जि.ठाणे स.नं.90/11 क्षेत्र 0-34-00, पो.ख.0-01-30 आकार 0.37 रु.पै. स.नं.90/12 क्षेत्र 0-25-00, आकार 0.29 रु.पै.