Ferfar #3135 · दुगाड
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/3/ब
- Talathi
- भावना रूपेश मरकड
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
सक्षम अधिकारी : मा. तहसीलदार भिवंडी यांचे कडील आदेश क्रमांक क्र.कुव/कलम 43/एस.आर.५०/2026/3587 दिनांक 30/06/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.
स.नं. / गट नं. =29/3/ब जमिन मालकाचे नाव = पांडुरंग शिवा पाटील
सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
सदर स.नं. च्या जमीनीचे जमीन मालक यांनी सदर जमीनीचे आकाराचे 40 पट रक्कम रुपये 350/-(अक्षरी रक्कम रुपये तिनशे पन्नास रुपये मात्र) नजराणा म्हणुन चलन क्रमांक MH005380836202627 P दिनांक 29/06/2026 अन्वये शासन जमा केल्याने मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 ची शर्त खालील नमुद अ.क्र. 1 ते 9 अटी व शर्तीस अधिन राहुन शिथिल केली असे.
1. प्रस्तावित जमिनीचा बिनशेती /बांधकामाकडे वापर करणेपुर्वी अनुज्ञाग्राही यांनी संबंधीत नियोजन प्राधिकरण तसेच सक्षम प्राधिकारी यांचेकडील बिनशेती परवानगी प्राप्त करुन बंधनकारक आहे. सदर परवानगी शिवाय जागेचा बिनशेतीकडे वापर केल्यास महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 मधील तरतुदीनुसार योग्य त्या शास्तीस पात्र राहील.
2 ही परवानगी वेळोवेळी राज्य शासनाचे / केंद्र शासनाचे प्रचलित कायदे वा नियम यांना अधिन राहुन दंड/बाकी शासनास पुर्व लक्ष्मी प्रभावाने अदा करणेस पात्र राहतील
3. प्रस्तुत जमिन मालक यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचे मजकुरास अधिन राहुन सदर परवानगी देणेत आली असुन प्रतिज्ञापत्रामधील मजकुराचे सत्यतेबाबत भविष्यांत कोणताही प्रश्न उपस्थित झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी जमिन मालक यांची राहील.
4. प्रकरणी सादर केलेल्या 1954-55 च्या 7/12 उताऱ्यांत अपुर्ण पिकपहाणी बाबत तसेच प्रस्तुत जमिनीचे क्षेत्राबाबत भविष्यांत काही उद्भवल्यास त्यास आताचे जमिन मालक हे जबाबदार राहतील.
5. सदर परवानगी प्रमाणे शर्तशिथील करत असताना मुंबई कुळवहविाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 63 चे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
6. सदरहु आदेशानंतर जर नमुद मिळकतीचे हस्तांतरण झाल्यास महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966, मुंबई तुकडेजोड तुकडेबंदी कायदा 1947, महाराष्ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961 सुधारीत कायदा 1975 इत्यादी अधिनियमांचे तरतुदींचे पालन करुन फेरफार मंजुर करणेबाबत नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी.
7. प्रस्तुत जमिन संबंधात कोणत्याही न्यायालयात दावा दाखल असल्यास व त्याबाबत भविष्यात कोणताही प्रश्न उपस्थिती झाल्यास सर्वस्वी जबाबदारी जमिन मालक यांची राहील.
8. सदर मिळकतीबाबत वारसांबाबत भविष्यात कोणताही प्रश्न उपस्थित झाल्यास सर्वस्वी जबाबदारी जमिन मालक यांची राहील.
9. प्रकरणी समाविष्ट असलेले कोणतेही कागदपत्र बनावट आढळुन आल्यास सदर परवानगी रद्द समजणेत येईल.
नोंद - मा. तहसीलदार सो. भिवंडी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र.कुव/कलम 43/एस.आर.-50/2026/3587 दिनांक 30/06/2026 अन्वये अटी १ ते ९ यांना अधीन राहून शर्त शिथिल केली असे.