सातबारा Watch

← अनगांव

Ferfar #2922 · अनगांव

भिवंडी, ठाणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
6/2
Talathi
योगिता बुधाजी झडे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 सक्षम अधिकारी तहसिलदार भिवंडी यांनी त्यांचे कडील क्र.कुव/कलम 43/एस आर-84/2026/4975 दिनांक 24/09/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. स.नं. / गट नं. = 6/2 सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 उपभूधारणा : उप उपभूधारणा : या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. बाजुस दाखल केलेली श्री. संतोष शंकर पाटील व इतर यांच्या स.नं.6/2 बाबत शासन निर्णयान्वये सद्यस्थितीत राज्यात विदर्भासाठी महाराष्ट्र कुळवहिवाट (विदर्भ प्रदेश) अधिनियम, 1958, मराठवाड्यासाठी हैद्राबाद कुळवहिवाट अधिनियम, 1950 व उर्वरित महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम, 1948 लागू आहे. सदर कायद्यातील अनुक्रमे कलम 57, कलम 50-ब, कलम 43 नुसार जमीन कसणाऱ्या कुळास कायद्यानुसार मालकी हक्क दिल्यापासुन 10 वर्षाचा कालावधी पुर्ण झाल्यावर जमिनीची विक्री करता येते. मात्र त्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांचेकडे महसूल आकारणीच्या 40 पट रक्कम भरावी लागते. तथापीसदर नजराण्याची रक्कम अंत्यत किरकोळ असल्यामुळे आणि त्यामुळे संबंधित शेतकऱ्यास नजराणा भरणे बाबत नाहक त्रास होत असल्याने महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा आकारणीची तरतूद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन कायदे (सुधारणा)अधिनियम, 2026 (दि. 15 एप्रिल 2026 चे राजपत्र) नुसार रद्द करण्यात आल्याने व महाराष्ट्र कुलवहिवाट व शेतजमिन अधिनीयम, 1948 च्या कलम 43 अन्वये 32-म प्रमाणपत्रनिर्गमित झाल्यापासुन 10 वर्ष पुर्ण झाल्याने मौजे अनगाव, ता. भिवंडी येथील स.नं. 6/2 क्षेत्र 0.01.00 हे. आर पो. ख. 0.00.20 हे.आर आकार 0.06 रु ची शर्त शिथिल करण्यात येत आहे. नोंद- मा. तहसीलदार साहेब भिवंडी यांचेकडील क्र.कुव/कलम 43/एस आर-84/2026/4975 दिनांक 24/09/2026 अन्वये नोंद.