Ferfar #2475 · कुंदे
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 90/5
- Talathi
- विकास पांडुरंग खरात
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
सक्षम अधिकारी उपविभागीय अधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र. बीडी/कुव/शशी/भिवंडी/एसआर/58/2026 दिनांक 06/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.
स.नं.90/5 क्षेत्र 1.17.00 हे.आर.प्र. आकार ( रु.पै) 1.13
मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम १९४८ चे कलम ४३ ची शर्त खालील नमुद अटी शर्तीस अधिन राहुन कृषी प्रयोजनासाठी शर्त शिथील करून देण्यांत येत आहे.
1) जमिनीचा बिनशेती/ बांधकामाकडे वापर करणेपुर्वी अनुज्ञाग्राही यांनी संबंधीत नियोजन प्राधिकरण तसेच समक्ष प्राधिकारी यांचेकडील बिनशेती परवानगी प्राप्त करुन बंधनकारक आहे. सदर परवानगी शिवाय जागेचा बिनशेतीकडे वापर केल्यास महाराष्ट्र जमिन महसुल अधिनिमय 1966 मधील तरतुदीनुसार योग्य त्या शास्तीस पात्र राहील.
2). ही परवानगी वेळोवेळी राज्य शासनाचे केंद्र शासनाचे प्रचलित कायदे वा नियम यांना अधिन राहुन दंड/बाकी शासनास पुर्व लक्ष्मी प्रभावाने अदा करणेस पात्र राहतील.
३). प्रस्तुत जमिन मालक यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचे मजकुरास अधिन राहुन सदर परवानगी देणेत आली असून प्रतिज्ञापत्रामधील मजकुराचे सत्यतेबाबत भविष्यांत कोणताही प्रश्न उपस्थित झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी जमिन मालक यांची राहील,
4). प्रकरणी सादर केलेल्या १९५४-५५ च्या ७/१२ उताऱ्यांत अपुर्ण पिकपहाणी बाबत तसेच प्रस्तुत जमिनीचे क्षेत्राबाबत भविष्यांत काही उद्भवल्यास त्यास आताचे जमिन मालक हे जबाबदार राहतील.
५). सदर परवानगी प्रमाणे शर्तशिथील करत असताना मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम १९४८ चे कलम ६३ चे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
6). सदरहु आदेशानंतर जर नमुद मिळकतीचे हस्तांतरण झाल्यास महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६, मुंबई तुकडेजोड तुकडेबंदी कायदा १९४७, महाराष्ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम १९६१ सुधारीत कायदा १९७५ इत्यादी अधिनियमांचे तरतुदींचे पालन करून फेरफार मंजुर करणेबाबत नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी.
7). प्रस्तुत जमिनी संबंधात कोणत्याही न्यायालयात दावा दाखल असल्यास व त्याबाबत भविष्यात कोणताही प्रश्न उपस्थिती झाल्यास सर्वस्वी जबाबदारी जमिन मालक यांची राहील.
8). गा.न.नं.७/१२ च्या इतर हक्कातील वारसांबाबत भविष्यात कोणताही प्रश्न उपस्थित झाल्यास सर्वस्वी जबाबदारी जमिन मालक यांची राहील.
9). प्रकरणी समाविष्ट असलेले कोणतेही कागदपत्र बनावट आढळून आल्यास सदर परवानगी रद्द समजणेत येईल.
सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.