Ferfar #876 · इताडे
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/09/2026
मा.विशेष वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये) यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई, 307 महावीर अर्पामेंट पंतनगर, घाटकोपर, मुंबई 400075 यांचेकडील जा.क्र.विवअ/यशो/23/442/2026-27 दिनांक-23/07/2026 रोजीचे पत्र प्राप्त झाले आहे. श्री.ज्ञानदेव गंगाराम पाटील यांनी धनको यशोमंदीर सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई यांचेकडुन दिनांक-05/04/2018 रोजी रक्कम रुपये 700000 /- स्थावर मालमत्ता तारण कर्ज घेतले आहे. मात्र कर्जाची नियमित परतफेड करण्यास टाळाटाळ केल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 नुसार मा.उप निबंधक, सहकारी संस्था (परसेवा), महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.मुबई यांचेकडे दावा दाखल करण्यात आला होता. त्याच्याविरुध्द वसुली दाखला क्र.101/6992/2023 दि.29/12/2023 रोजी प्राप्त झाला असुन त्यानुसार त्यांचेकडुन खाली नमुद केलेली रक्कम वसुल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. वसुली दाखल्याप्रमाणे त्यांचेकडुन दावा रक्कम रु.971859/-व या रक्कमेतील मुद्दल रु.698286/- वर दि.01/07/2023 पासुन पुढे 14% ने नमुद केलेले लवादी थकबाकीदार यांचेकडुन एकत्रित व सामुयिकरित्या वसुली करण्याकरिता वसुली दाखला प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 चे नियम 107 नुसार श्री.ज्ञानदेव गंगाराम पाटील यांचे नावे असलेल्या मौजे-इताडे, ता.भिवंडी, जि.ठाणे येथील जमिनीचे गट नंबर/ सर्वे नंबर 1/10/अ, 1/9, 15/2, 15/6, 22/1, 25/4, 31/2, 33/2, 33/3/ब, 33/4/1/अ, 35/3/ब या जमीन मिळकतीवर त्यांचे हिश्यापुरता लवादी थकबाकी रक्कम रुपये-1199500/-ची नोंद इतर अधिकार सदरी घेतली.
नोंद-यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई यांनी जा.क्र.विवअ/यशो/23/442/2026-27 दिनांक-23/07/2026 अन्वये नोंद केली असे.