Ferfar #3225 · चाविंद्रे
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
बाजुस दाखल केलेल्या मौजे- चाविंद्रे ता. भिवंडी जि.ठाणे येथील स.नं 65/2/2, 64/1/1 व 65/1/1 या जमिनीबाबत अर्जदार शहजाद शोएब खान यांनी अर्ज दिला की, सदर जमिनीचे खातेदार मोसीरुल इसलाम मझर इसलाम खान हे दिनांक 19/01/2021 रोजी मयत झाले असुन सदर मृत व्यक्तीने मृत्यु पुर्वी मलेशिया येथे मृत्युपत्र केले आहे. सदर मृत्युपत्राच्या अनुषंगाने अर्जदार यांनी मा. दिवाणी न्यायालय भिवंडी यांचेकडे दाखल केलेल्या दावा क्र. CIVIL M.A NO. 1280/2021 च्या अनुषंगाने मा. दिवाणी न्यायालय (व स्तर) भिवंडी यांचे न्यायालयाने LETTER OF ADMINISTRATION जारी केल्याने मौजे- चाविंद्रे ता. भिवंडी येथील गट नंबर/सर्वे नंबर 65/2/2, 64/1/1 व 65/1/1 ची जमीन मिळकत शहजाद शोएब खान यांना मृत्युपत्राने लिहुन दिलेने मृत्युपत्र लिहुन ठेवणार मोसीरुल इसलाम मझर इसलाम खान यांचे नांव कमी करुन शहजाद शोएब खान यांचे नांव ७/१२ ला दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र , व मा. दिवाणी न्यायालय (व स्तर) भिवंडी यांचेकडील LETTER OF ADMINISTRATION आदेश वरुन नांव दाखल केले असे.