Ferfar #2866 · बिरवाडी
शहापुर, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शहापूर यांचेकडील आदेश क्र. कुळवहिवाट/कलम-४३/एसआर नं. ६९/२०२६, दिनांक १६/१०/२०२६ नुसार महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ च्या कलम ४३ अन्वये जमीन कसणाऱ्या कुळास कायद्यानुसार मालकी हक्क दिल्यापासून १० वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर जमिनीची विक्री करता येते.मात्र त्यासाठी मा.जिल्हाधिकारी यांचेकडे महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा रक्कम भरावी लागते तथापि, सदर नजराण्याची रक्कम अत्यंत किरकोळ असल्याने महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा आकारणीची तरतूद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम, २०२६ (दि.१५ एप्रिल २०२६ चे राजपत्र) नुसार रद्द करण्यात आली आहे. तरी महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ च्या कलम ४३ अन्वये ३२-म प्रमाणपत्र निर्गमित झाल्यापासून १० वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला असल्याने व तसेच मा. तहसीलदार शहापूर यांचेकडील आदेशान्वये संबंधित जमिनींवरील कलम ४३ ची अट शर्त शिथिल करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने खालील नमूद जमिनींच्या इतर हक्कातील सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी-कुळ कायद्याने प्राप्त जमीन ही नोंद कमी करण्यात येत आहे.व तसेच सदर जमिनींचे ७/१२ भोगवटदार वर्ग २ वरून भोगवटदार वर्ग १ मध्ये रुपांतरीत केला असे.
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ च्या कलम ४३ अन्वये शर्त शिथिल करायच्या जमिनींचा तपशील खालीलप्रमाणे
अ.क्र. मौजे स.नं. क्षेत्र (हे.आर.) ३२-ग फेरफार क्र. ३२-म फेरफार क्र. भोगवटदाराचे नाव
१) बिरवाडी २२० ०.५३६० १२३३ ६७६ जेठू कमळू आमला व इतर
२) बिरवाडी २२३/२ ०.२७०० १२४५ ६७४ तुकाराम सोमा धापटे व इतर
३) बिरवाडी २२३/३ ०.५४४० १२३४ ६७३ रेणुका लक्ष्मण धापटे व इतर
४) बिरवाडी २२३/४ ०.४९६० १२४५ ६७४ तुकाराम सोमा धापटे व इतर
५) बिरवाडी २२४/२ ०.०९०० १२४५ ६७४ तुकाराम सोमा धापटे व इतर
६) बिरवाडी २२४/५ ०.२३०० १२४५ ६७४ तुकाराम सोमा धापटे व इतर
७) बिरवाडी २२४/७ १.४४०० १२४५ ६७४ तुकाराम सोमा धापटे व इतर
८) बिरवाडी २२९/२/अ ०.३५२० १२३३ ६७६ संगिता गणपत कालचिडा
९) बिरवाडी २३२/७/१ २.८१०० १२४५ ६७४ तुकाराम सोमा धापटे व इतर
(नोंद :- मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शहापूर यांचेकडील आदेश क्र. कुळवहिवाट/कलम-४३/एसआर नं. ६९/२०२६, दिनांक १६/१०/२०२६ अन्वये नोंद केली असे.)