Ferfar #1842 · सावरोली बु.
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 181
- Talathi
- रूख्मिणी महादेव बुंदे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मा. उपविभागीय अधिकारी भिवंडी, उपविभाग भिवंडी आदेश क्र बिडी / आर टी एस /अपील नं 132/2024 दिनांक 02/02/2026 यांचा आदेश नुसार अपीलार्थी तुकाराम सातपुते रा. सावरोली बु. यांचा अपीला नुसार अपिलार्थी यांनी प्रस्तुत अपील अर्ज मौजे-सावरोली बु., ता. शहापूर, जि. ठाणे येथील उक्त वादातील मिळकतीच्या तपशिलात नमुद दावा मिळकतीबाबत पारित करण्यात आलेला चौकशी अधिकारी तथा निवासी नायब तहसिलदार शहापूर यांचेकडील क्र. महसुल / आरटीएस/एसआर-००००४/२०१६ दि.२७/१२/२०१६ रोजीच्या आदेशाविरुध्द या न्यायालयात अपिल दाखल केले होते
अपिल मिळकत ही अपिलकर्ता संदीप तुकाराम सातपुते यांची वडीलोपार्जित मिळकत आहे. सदर मिळकत ही सामनेवाले संजय रामचंद्र जाधव व रमाकांत लक्ष्मण गावकर यांनी कमळ तुकाराम सातपुते हिच्याकडून मे. दुय्यम निबंधक साो. मुरबाड यांचेकडील दस्त ५०१/१९९४ नोंदणी दि. २९/६/१९९४ रोजी रक्कम रू. ३०,०००/- या किंमतीसगट नं १८१ च्या एकूण क्षेत्र १.४१.१ ही आर पैकी ०.१०.० एवढे क्षेत्र खरेदी घेतल्याचे दाखविलेले आहे. त्यावेळेस अपिलकार संदीप तुकाराम सातपुते हे अज्ञान होते.सदर मिळकत आज्ञानाची होती ती मिळकत खरेदी करताना कमळ तुकाराम सातपुते यांनी संजय रामचंद्र जाधव व रमाकांत लक्ष्मण गावकर यांचे बरोबर व्यवहार करण्यापूर्वी मे. दिवाणी न्यायधीश सो. व. स्तर कल्याण यांचे कडून गारडियन अँड वॉर्ड अॅक्ट १८९० चे तरतुदी नुसार सदर कामी मिळकत विक्री करताना परवानगी घेणे अज्ञानचे हितासाठी आवश्यक होते. पण ती न घेता खरेदी खत झाले. सदर त्या खरेदी खतानुसार गावी फेरफार क्र १४१७ नोंदविण्यात येऊन म. तहसीलदार शहपूर यांचेकडील २०१६ आदेशावरून सदर फेरफार मंजूर करण्यात आला त्यावर अपीलयार्थी यांनी म. उपविभागीय भिवंडी यांचे कडे अपील दाखल करून मा उपविभागीय अधिकारी बीडी/आरटीएस//अपील नं.132/2024 दिनांक 02/02/2026 पारित केल्याने सदर आदेशा नुसार फेरफार क्र १४१७ रद्द करण्यात आल्याने त्यापूर्वी परिस्थिति च्या नुसार फेरफार क्र १४१७ रदद करून खरेदी केलेले क्षेत्र ०.१०.०० हे आर चौ मी पूर्वीच्या खातेदार यांना देण्यात आले .