Ferfar #939 · विहीगाव
शहापुर, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मौजे-विहीगाव, ता शहापूर, जि-ठाणे येथील स.नं. 154/2, 161/2, 162, 164/1, 182/2 व 217/3 या जमिनींचे मूळ मालक श्री. भोरू भाग्या गिरा हे होते व ते मयत झालेनंतर फेरफार क्र. 632 दि. 16/11/1983 अन्वये त्यांचे नाव कमी करून श्री. नवसू सोमा गिरा, श्री. बबन वाळु गिरा व श्री. कमळु वाळु गिरा यांचे नावाची नोंद करण्यात आलेली दिसून येत आहे.सदर गावी एकत्रिकरण योजना अंमलात आलेली असून त्याव्दारे स.नं. 154/2, 161/2, 162, 164/1, 182/2 व 217/3 या जमिनींचे पुढील प्रमाणे अधिकार अभिलेख घडविण्यात आलेले आहेत गट नं 477 (स.नं.154/2) क्षेत्र-3.28.00 हे.आर , गट नं 11 (स.नं.164/1) क्षेत्र-0.12.90 हे.आर, गट नं 12(स.नं.182/2) क्षेत्र-0.77.00 हे.आर, गट नं 15 (स.नं.161/2,217/3) क्षेत्र- 2.50.60 हे.आर, गट नं 18 (स.नं.162) क्षेत्र-0.18.50 हे.आर असे एकत्रीकरणापूर्वी व एकत्रीकरणानंतरचे असे अभिलेख तयार करण्यात आले आहेत .प्राप्त अधिकार अभिलेख पहाता सदर जमिनीचे 7/12 वरील कब्जेदार सदरी श्री. नवसू सोमा गिरा, श्री. बबन वाळू गिरा व श्री. कमळ वाळु गिरा यांचे नावाची नोंद करण्याऐवजी पुर्वाश्रमीचे खातेदार श्री. भोरू भाग्या गिरा यांचेच नावाची नोंद करण्यात आलेली असून तदनंतर फेरफार क्र. 26 दि. 21/09/1989 यामध्ये नमुद असल्याप्रमाणे श्री. भोरू भाग्या गिरा यांचे नाव कमी करून श्री. बबन वाळु गिरा, श्री. कमळ वाळू गिरा, श्रीम. पार्वती सोनु वाघ व श्रीम, व्दारकी वाळु गिरा यांची नावे दाखल केलेली दिसून येत आहेत. त्यापैकी श्री. बबन वाळू गिरा यांचे मृत्युनंतर फेरफार क्र. 95 दि. 25/06/1992 अन्वये श्री.सुंदर बबन गिरा यांचे नावाची नोंद करण्यात आलेली असून ते मयत झाल्यामुळे फेरफार क्र. 820 दि. 05/03/2025 अन्वये त्यांचे नाव कमी करून श्रीम. गुलाब सुंदर गिरा व श्री. निवृत्ती सुंदर गिरा यांची नावे दाखल केलेली दिसून येत आहेत. तसेच श्री. कमळु वाळु गिरा यांचे निधनानंतर फेरफार क्र. 830 दि. 19/04/2025 नुसार श्रीम, लक्ष्मी लक्ष्मण भले व श्रीम इंदुबाई गोविंद कामडी यांचे नावाची नोंद करण्यात आलेली असून श्रीम. पार्वती सोनु वाघ व श्रीम. व्दारकी वाळु गिरा यांचे मृत्युपश्चात फेरफार क्र. 885 दि. 05/12/2025 अन्वये श्रीम. गुलाब सुंदर गिरा, श्री. निवृत्ती सुंदर गिरा, श्रीम, लक्ष्मी लक्ष्मण भले व श्रीम. इंदुबाई गोविंद कामडी यांची नावे दाखल केलेली दिसून येत आहेत.
त्याअर्थी सदर जमिनींचे मुळ खातेदार श्री. भोरू भाग्या गिरा यांना फेरफार क्र. 632 दि. 16/11/1983 यामध्ये नमूद असल्याप्रमाणे श्री. नवसू सोमा गिरा, श्री. बबन वाळु गिरा व श्री. कमळु वाळु गिरा असे तीन वारस होते, परंतु सदर फेरफाराप्रमाणे उक्त जमिनीचे 7/12 सदरी त्यांचे नावाचा अंमल न केल्यामुळे सदर जमिनींचे 7/12 वर असलेल्या खातेदारांचे नावासहीत सामाईक खातेदार म्हणून श्री. नवसू सोमा गिरा यांचे नावाची नोंद करणे आवश्यक आहे तरी मौजे विहीगाव ता.शहापूर येथील गट नं 477 (स.नं.154/2) क्षेत्र-3.28.00 हे.आर , गट नं 11 (स.नं.164/1) क्षेत्र-0.12.90 हे.आर, गट नं 12(स.नं.182/2) क्षेत्र-0.77.00 हे.आर, गट नं 15 (स.नं.161/2,217/3) क्षेत्र- 2.50.60 हे.आर, गट नं 18 (स.नं.162) क्षेत्र-0.18.50 हे.आर या जमिनीचे सातबारा सदरी फेरफार क्र 632 दि. 16/11/1983 या मंजूर फेरफाराप्रमाणे श्री. नवसू सोमा गिरा यांचे नावाची नोंद करणेत येऊन व ते मयत असल्यामुळे त्यांचे कायदेशिर वारस म्हणून फेरफार क्र. 26, 95, 820, 830 व 885 या मंजूर फेरफाराचे अनुषंगाने वरनमूद वारसांची नावे दाखल करणेकामी मा.तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शहापूर यांचेकडील आदेश क्र. महसूल/आरटीएस/टे-2/कावि-970/2026 दि.09/10/2026 वरील अधिकार अभिलेखातील फेरफार क्र 632 दि. 16/11/1983 या मंजूर फेरफाराप्रमाणे श्री. नवसू सोमा गिरा यांचे नाव अधिकार अभिलेखात दाखल केले असे.