सातबारा Watch

← वाशाळा बुद्रुक

Ferfar #1806 · वाशाळा बुद्रुक

शहापुर, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
313, 373, 510/अ
Talathi
हरिश्चंद्र बाळू पारधी
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मौजे वाशाळा बु., ता.शहापूर,जि.ठाणे येथील स.नं. 260, 161, 261, 162/1, 3/1, 168/5, 168/7 व 68/5 या जमिनींचे मुळ मालक श्री. वामन पदू धानके हे होते व त्यांचे निधनानंतर गावचे हक्कपत्रकी फेरफार क्र. 714 दि. 09/01/1971 कडे फेरफार नोंद घेण्यात आलेली असून त्यामध्ये त्यांना श्री. पांडुरंग वामन धानके, श्री. गोविंद वामन धानके, श्री. काशिनाथ वामन धानके, श्री. शांताराम वामन धानके, श्री. भरत वामन धानके, श्रीम. भागुबाई वामन धानके, श्रीम. मंदाकिनी वामन धानके व श्रीम. लक्ष्मीबाई वामन धानके या प्रमाणे वारस असल्याचे नमूद आहे. तथापि सदर जमिनींचे 7/12 सदरी उक्त फेरफारामध्ये नमूद असल्याप्रमाणे ए.कु.पु. म्हणून श्री. पांडुरंग वामन धानके यांचेच नावाची नोंद करण्यात आलेली दिसून येत आहे.सदर गावी एकत्रिकरण योजना अमलात आलेली असून त्यामध्ये स.नं. 260, 161, 261, 162/1, 3/1, 168/5, 168/7 या जमिनींचे गट नंबर 510,373,313,311 अशा प्रमाणे नविन अधिकार अभिलेख तयार करण्यात आले. त्याअर्थी सदर जमिनीचे मुळ खातेदार श्री. वामन पदू धानके हे होते व त्यांचे मृत्युपश्चात त्यांना फेरफार क्र. 714 दि. 09/01/1971, फे.क्र. 186 दि. 17/12/1990 व फे.क्र. 1657 दि. 09/12/2022 यामध्ये नमूद असले प्रमाणे श्री. पांडुरंग वामन धानके, श्री. गोविंद वामन धानके, श्री. काशिनाथ वामन धानके, श्री. भरत वामन धानके, श्रीम. सकुबाई वामन देसले, श्रीम. मंदा विठ्ठल कनकोसे, श्रीम, लक्ष्मीबाई वामन धानके व कै. शांताराम वामन धानके (मयत) वारस श्रीम. सुगंधा शांताराम धानके, श्रीम. नंदिनी विठ्ठल विदे, श्री. दिगंबर शांताराम धानके व श्री. दिलीप शांताराम धानके असे वारस आहेत. मात्र सदर जमिनींचे 7/12 सदरी केवळ ए. कु.पु. श्री. पांडुरंग वामन धानके यांचे नावाची नोंद केली आहे. सदर जमिनींमध्ये श्री. पांडुरंग वामन धानके यांचेसह श्री. गोविंद वामन धानके व इतर यांचा देखील वडीलोपार्जित वारसा हक्क आहे असे दिसते. गट नं. 311 या जमिनीचे 7/12 सदरी सर्व वारसांची नावे दाखल केलेली असली तरीही उर्वरित गट नं. 313, 373 व 510/अ या जमिन मिळकतीचे 7/12 सदरी उक्त फेरफारांमध्ये नमूद असलेले सर्व वारसांचे नावाची नोंद करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे गट नं. 313,373 व 510/अ या जमिनींचे 7/12 सदरी फेरफार क्र. 714 दि. 09/01/1971 यामध्ये नमूद असल्याप्रमाणे श्री. पांडुरंग वामन धानके यांचेसह श्री.गोविंद वामन धानके, श्री. काशिनाथ वामन धानके, श्री. शांताराम वामन धानके, श्री. भरत वामन धानके, श्रीम. भागुबाई वामन धानके, श्रीम. मंदाकिनी वामन धानके व श्रीम. लक्ष्मीबाई वामन धानके यांची नावे दाखल करणेकामी मा. तहसिलदार शहापूर यांचेकडील आदेश क्र.महसूल/आरटीएस/टे-2/कावि-1877/2025 दिनांक 23/09/2026 नुसार जमिनींचे अधिकार अभिलेखात 7/12 सदरी फेरफार क्र. 714 दि. 09/01/1971 या मंजूर फेरफाराप्रमाणे वरील उक्त 7/12 सदरी अंमल घेतला असे.