Ferfar #658 · परटोली
शहापुर, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
बाजुस दाखल केलेल्या स.नं./ग.नं 194/अ, 194/ब, 176, 187, 207, 47, 71, 72 या जमीनीचे खातेदार बाळकृष्ण आलो ढमके यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाळु आलो ढमके ऐवजी बाळकृष्ण आलो ढमके असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे केलेला होता, या अनुषंगाने मा.तहसिलदार शहापुर यांचेकडील आदेश क्रमांक क्र.महसूल/कक्ष-1/आरटीएस -2/कावि -577/2026 दि. 07/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातींचा विभाग, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर 8-14, 2009/आश्विन 16-22, शके 1931 मधील नोंदणी क्रमांक (एक्स-23189) अन्वये बाळु आलो ढमके ऐवजी बाळकृष्ण आलो ढमके असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. मा. तहसीलदार शहापूर यांचेकडील आदेशातील अटी व शर्ती क्र. 1 ते 3 यांस अधीन राहून व राजपत्रानुसार 7/12 वरील नावात बदल करण्यासाठीच्या आदेशान्वये 7/12 ला नोंद केली असे.