सातबारा Watch

← नडगाव (लेनाड)

Ferfar #3524 · नडगाव (लेनाड)

शहापुर, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
140/2/अ, 143/7, 147/2, 148, 153/3, 21/17/अ, 21/17/क, 21/17/ब, 222/11, 42/3
Talathi
चंद्रकांत विनायक पटणे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शहापूर यांचेकडील आदेश क्र. कुळवहिवाट/कलम-४३/एसआर नं. ६८/२०२६, दिनांक १६/१०/२०२६ नुसार महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ च्या कलम ४३ अन्वये जमीन कसणाऱ्या कुळास कायद्यानुसार मालकी हक्क दिल्यापासून १० वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर जमिनीची विक्री करता येते.मात्र त्यासाठी मा.जिल्हाधिकारी यांचेकडे महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा रक्कम भरावी लागते तथापि, सदर नजराण्याची रक्कम अत्यंत किरकोळ असल्याने महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा आकारणीची तरतूद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम, २०२६ (दि.१५ एप्रिल २०२६ चे राजपत्र) नुसार रद्द करण्यात आली आहे. तरी महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ च्या कलम ४३ अन्वये ३२-म प्रमाणपत्र निर्गमित झाल्यापासून १० वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला असल्याने व तसेच मा. तहसीलदार शहापूर यांचेकडील आदेशान्वये संबंधित जमिनींवरील कलम ४३ ची अट शर्त शिथिल करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने खालील नमूद जमिनींच्या इतर हक्कातील सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी-कुळ कायद्याने प्राप्त जमीन ही नोंद कमी करण्यात येत आहे.व तसेच सदर जमिनींचे ७/१२ भोगवटदार वर्ग २ वरून भोगवटदार वर्ग १ मध्ये रुपांतरीत केला असे. महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ च्या कलम ४३ अन्वये शर्त शिथिल करायच्या जमिनींचा तपशील खालीलप्रमाणे अ.क्र. मौजे स.नं. क्षेत्र (हे.आर.) ३२-ग फेरफार क्र. ३२-म फेरफार क्र. भोगवटदाराचे नाव १) नडगाव(लेनाड) स.नं. १४०/२/अ क्षेत्र १.०२ हे.आर. ८६५ १५७१ भागीबाई मालु उघडे व इतर २) नडगाव(लेनाड) स.नं.१४३/७ क्षेत्र ०.१४ हे.आर. ११८१ १५३८ अशोक भिका अगिवले व इतर ३) नडगाव(लेनाड) स.नं.१४७/२ क्षेत्र ०.४५९ हे.आर. ८७९ १०४० दत्तु गणु दोरे ४) नडगाव(लेनाड) स.नं.१४८ क्षेत्र १.५९८ हे.आर. ८०६ १०३० सखुबाई दामू उघडे व इतर ५) नडगाव(लेनाड) स.नं.१५३/३ क्षेत्र ०.६४७ हे.आर. ८७६ १०५० अनंता लक्ष्मण निरगुडा ६) नडगाव(लेनाड) स.नं. २१/१७/अ क्षेत्र ०.२ हे.आर. ८८० ९१२ अनिल भाऊ भालके व इतर ७) नडगाव(लेनाड) स.नं. २१/१७/ब क्षेत्र ०.१ हे.आर. ८८० ९१२ आशाबाई जानु भालके व इतर ८) नडगाव(लेनाड) स.नं. २१/१७/क क्षेत्र ०.१ हे.आर. ८८० ९१२ अलका शंकर भालके व इतर ९) नडगाव(लेनाड) स.नं. २२२/११ क्षेत्र ०.१८२ हे.आर. ९०७ १०२८ पांडुरंग अनंता बेलवले १०) नडगाव(लेनाड) स.नं. ४२/३ क्षेत्र ०.०२५ हे.आर. ८७५ २८१७ द्वारकाबाई पांडुरंग पाटोळे व इतर नोंद :- मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शहापूर यांचेकडील आदेश क्र. कुळवहिवाट/कलम-४३/एसआर नं. ६८/२०२६, दिनांक १६/१०/२०२६ अन्वये नोंद केली असे.