सातबारा Watch

← गोळवली

Ferfar #2645 · गोळवली

कल्याण, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-21
Objection until
2026-09-08
Certified
—
Gat / Survey
25/18, 25/25, 32/1, 33/2, 33/3, 33/4
Talathi
लक्ष्मण नाना शिंदे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/08/2026 मा.तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कल्याण यांचेकडील क्रमांक/महसूल/हक्कनोंद-/कावि-383/2026 दिनांक.7/08/2026 अन्वये तसेच मा.सह दिवाणी न्यायाधीश व स्तर कल्याण यांचेकडील नियमित दिवाणी दावा क्र.107/2013 निशाणी क्र.133 दि.08/05/2026 तसेच मा.जिल्हाधिकारी ठाणे यांचेकडील पत्र क्र. महसूल/क-1/टे-5/E9007680/2026 दि.25/05/2026 नुसार बाजुस दाखल केलेल्या मौजे-गोळवली, ता.कल्याण, जि.ठाणे येथील स.न. 25/18, 25/25, 32/1, 33/2, 33/3, 33/4 या जमिन मिळकत बाबत अर्जदार 1) श्री.बबन धर्मा भोईर,रा.पिसवली,ता.कल्याण,जि.ठाणे. 2) श्रीम.इंदुबाई शालिक पाटील, रा.उबरोली,ता.अंबरनाथ,जि.ठाणे यांनी मा.सह दिवाणी न्यायाधीश व स्तर कल्याण. जि.ठाणे यांचे न्यायालयात नियमित दावा क्र.107/2013 निशाणी क्र.133 अन्वये दावा मिळकत वाटणी होऊन तांबा मिळणेबाबत दावा दाखल केला होता सदर दावा बाबत दिनांक. 08/05/2026 रोजी न्यायनिर्णय होऊन खालील प्रमाणे आदेश पारित झाला आहे. :: आदेश :: 1)वादींचा दावा अशंतः मंजुर करण्यात येतो. 2)वादी व प्रतिवादी यांचा वादग्रस्त मिळकतीमध्ये हिस्सा असल्याचे जाहीर करण्यात येते. 3)वादी क्र. १ व २ यांना वादग्रस्त मिळकत क्र. १ ते ६ मध्ये अर्धा हिस्सा व उर्वरीत अर्धा हिश्श्यापैकी प्रतिवादी क्र. १/१ ते १/४ यांना १/३ हिश्श्यामध्ये समान व प्रतिवादी क्र. २ व ३ यांना १/३ हिश्श्यामध्ये समान, प्रतिवादी क्र. ४ ते ८ यांना १/३ हिश्श्यामध्ये समान हिस्सा वाटणी करुन ताब्यात देण्यात यावा. 4)प्रतिवादी यांनी त्यांच्या हिश्श्याचा मुद्रांक शुल्क भरणा करावा. 5)दिवाणी प्रक्रिया संहिताचे कलम ५४ प्रमाणे प्रस्तुतचा हुकूमनामा अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे पाठविण्यात यावा. वरील प्रमाणे मा.सह दिवाणी न्यायाधीश व स्तर कल्याण जि.ठाणे यांचा आदेश झालेने वादी 1) श्री.बबन धर्मा भोईर 2) श्रीम.इंदुबाई शालिक पाटील यांचे नांवे मौजे-गोळवली, ता.कल्याण, जि.ठाणे येथील स.न. 25/18, 25/25, 32/1, 33/2, 33/3, 33/4 या जमिन मिळकतीमध्ये अर्धा हिस्सा क्षेत्र न्यायालयाचे आदेशाप्रमाणे वाटप केले असे.